2. देशातील कोरोना बाधितांचा आकडा 19 हजाराजवळ; आतापर्यंत 3259 लोकांना डिस्चार्ज तर 603 लोकांचा मृत्यू
3. कोरोनामुळे जगभरात पावणेदोन लाखांहून अधिक बळी, अमेरिकेत सर्वाधिक लोकांचा मृत्यू तर जगात 25 लाख 57 हजार कोरोनाग्रस्त
4. परराज्यातील मजुरांसाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची केंद्र सरकारकडे मागणी
5. मुंबई- पुणे भागात लॉकडाऊनबाबतीत सवलती रद्द, वाढलेल्या गर्दीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश
6. मातोश्री नंतर वर्षाच्या अंगणात कोरोनाची धडक, मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर तैनात महिला पोलिसाला कोरोनाची लागण
7. मुंबईतील मुलुंड आणि भायखळा भाजी बाजारात प्रचंड गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवून भाजी खरेदी
8. चीनमधून आलेल्या रॅपिड टेस्ट किट्सबाबत राजस्थानमधून तक्रारी, इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चकडून किट्सचा वापर थांबवण्याच्या सूचना
9. फेसबुकचा रिलायन्ससोबत मोठा व्यवहार, रिलायन्स जिओमधील 9.99 टक्के भागभांडवल फेसबुक विकत घेणार, बुधवारी केली घोषणा
10. पालघर प्रकरणात राज्य सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून राज्याच्या पोलीस महासंचालकांना नोटीस