Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 22 ऑगस्ट 2021 रविवार | ABP Majha
1. काबुलमध्ये अडकलेल्या 400 भारतीयांना घेऊन एअर इंडिया आणि भारतीय वायुसेनेचं विमान दिल्लीत दाखल
2. ऑक्सिजनची गरज वाढल्यास लॉकडाऊन लावावा लागणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे वक्तव्य, तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर इशारा
3. बालसंगोपन निधीच्या अनुदानात वाढ करण्यास अजित पवारांची नकारघंटा, महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांचा गंभीर आरोप
4. मातोश्रीच्या परवानगीशिवाय एकही फाईल हलत नसल्यानं एकनाथ शिंदे कंटाळलेत, लवकरच त्यांना भाजपात घेऊ, नारायण राणेंचा गौप्यस्फोट
5. परमबीर सिंह यांच्याविरोधात आणखी एक वसुलीचा गुन्हा नोंद, त्यांच्या सांगण्यावरुनच सचिन वाझे वसुली करायचे, विमल अग्रवाल यांचा आरोप
6. भीमा कोरेगाव प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आयोगाला मुंबईत जागाच उपलब्ध नाही, 23 ते 25 ऑगस्ट दरम्यानची सुनावणी रद्द
7. कोरोना काळात नोकरी गमावणाऱ्यांचा पीएफ 2022 पर्यंत सरकार भरणार, केंद्रीय अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
8. जम्मू-काश्मीरवर चर्चा न केल्यास गंभीर परिणाम होईल, अफगाणिस्तानचं उदाहरण देत मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारला इशारा
9. बिहारमध्ये राज्य स्तरावर जातीय जनगणना होणार, नितीश कुमारांचे संकेत, सोमवारी पंतप्रधानांची घेणार भेट
10. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास