दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो...
1. सोमवारपासून शाळा सुरु करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाचा प्रस्ताव,आदित्य ठाकरेंचीही टास्क फोर्सशी चर्चा, आता मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा
2. येत्या स्थानिक निवडणुकांसाठी ओबीसी आरक्षणाचा निर्णय राज्य मागासवर्ग आयोग घेणार, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळं दिलासा, मात्र कोर्टाकडून ट्रिपल टेस्टच्या पूर्ततेसंदर्भात आवर्जून आठवण
3. 25 नगरपंचायतींमध्ये सत्ता मिळवत राष्ट्रवादीची सरशी, तर शिवसेनेला 14 नगरपंचायतींमध्ये यश, महाविकास आघाडीतील नंबर वनची जागा राष्ट्रवादीकडे सरकत असल्याची चर्चा
4. नंगरपंचायतीत अपेक्षित यश न मिळाल्यानं काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यावर आक्षेप, मित्रपक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून आत्मचिंतनाचा सल्ला
5. गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार, पत्रकार परिषदेत घोषणा, शिवसेना गोव्यात किंगमेकर ठरेल, संजय राऊत यांचं वक्तव्य
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 20 जानेवारी 2022 : गुरुवार : एबीपी माझा
6. पुण्यातील बालेवाडीतून अपहरण झालेला स्वर्णव चव्हाण अखेर सापडला, पुनावळे गावात स्वर्णवला सोडून अपहरणकर्ता फरार
7. मुंबईत कोरोनाची तिसरी लाट ओसरण्यास सुरुवात; दैनंदिन रुग्णसंख्येत सहा हजारांपर्यंत घट, काल दिवसभरात सहा हजार 32 कोरोनाबाधित रुग्ण
8. नवी मुंबई आणि मुंबईला जोडणारा मेट्रो मार्ग विकसित करा, सिडकोचा 'एमएमआरडी'ला प्रस्ताव, मानखुर्द ते बेलापूर मेट्रोनं जोडण्याची मागणी
9. अमेरिकेत सुरु झालेल्या 5-जी सेवेमुळं विमान कंपनीच्या नेव्हिगेशन यंत्रणेत व्यत्यय, एअर इंडियाकडून आज तीन विमानांचं उड्डाण रद्द
10. पहिल्या वन डेत टीम इंडियाच्या पदरी पराभव; दक्षिण आफ्रिका 31 धावांनी विजयी, विराट आणि धवनसह शार्दूलचीही अर्धशतकी खेळी व्यर्थ
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा