देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

  1. मुंबईत आजपासून पन्नास टक्के दुकानं बंद, महापालिकेचा निर्णय, सरकारी कार्यालयातही 50 टक्के उपस्थिती, बसमध्ये उभ्यानं प्रवास करण्यास मनाई


 

  1. सीबीएसईची दहावी, बारावीची परीक्षा पुढे ढकलली, 31 मार्चनंतर नव्या तारखा जाहीर होणार तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रात्री 8 वाजता मोदी देशाला संबोधित करणार


 

  1. काल दिवसभरात 4 नवे रुग्ण आढळल्यानं राज्यातल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 45 वर, मुंबई, पुणे आणि पिंपरीमध्ये नवे रुग्ण, तर परदेशात 276 भारतीयांना कोरोना


 

  1. कोरोनामुळं राज्यभरातली लग्नकार्य पुढे ढकलली, पुण्यासह वेगवेगळ्या जिल्ह्यातील सलून बंद, ऑनलाईन वीज भरण्याचं महावितरणचं आवाहन


 

  1. मुंबईत तब्बल 1 कोटीचं सॅनिटायझर जप्त, विनापरवाना ओमानला निर्यात करण्याचा डाव उधळला, नागपुरातही बनावट सॅनिटायझरच्या 1 हजार बाटल्या जप्त


 

पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 19 मार्च 2020 | गुरुवार | ABP Majha




  1. कोरानामुळे नागरिकांमधील धास्तीचा गैरफायदा, कोरोना व्हायरसपासून बचाव करणारी गादी, भिवंडीत फसव्या जाहिरातदाराविरोधात गुन्हा दाखल


 

  1. इटलीत कोरोनामुळे आतापर्यंत दोन हजार नऊशे लोकांचा मृत्यू, चोवीस तासात 475 जणांचा जीव गेला, जगभरात दोन लाखांहून अधिक रुग्ण


 

  1. कोरोनासोबतच राज्यावर अवकाळी पावसाचं संकट; काही जिल्ह्यात गारपीटीसह जोरदार पाऊस; फळबागांचं अतोनात नुकसान


 

  1. येस बँकेच्या खातेदारांना दिलासा, रिझर्व्ह बँकेने सर्व निर्बंध हटवले, 50 हजारापेक्षा जास्त रक्कम काढता येणार, तर बँकेच्या सर्व सेवाही सुरळीत


 

  1. कोरोगाव भीमाप्रकरणी शरद पवारांची 4 एप्रिलला साक्ष नोंदवणार, कोरोगाव भीमा चौकशी आयोगाकडून शरद पवारांना समन्स