देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या स्मार्ट बुलेटीनमध्ये...


1. कामावर हजर व्हा अन्यथा सेवा समाप्त, रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाचं 24 तासांचं अल्टिमेटम


2. अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईवर सायबर भामट्यांची नजर, अनोळखी व्यक्तीला बॅंकेची कुठलीही माहिती देऊ नका, सायबर क्राइम ब्रॅन्चचं आवाहन


3. हे कायद्याचं नव्हे, 'काय ते द्या'चं राज्य, देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोल, मुनगंटीवार आणि आशिष शेलारांचंही सरकारवर टीकास्त्र


4. अमरावती शहरातील इंटरनेट सेवा पुढील  2 दिवस बंदच राहणार, अमरावती शहरातील संचारबंदीत काही प्रमाणात शिथिलता


 अमरावती शहरातील इंटरनेट सेवा  पुढचे 2 दिवस बंद राहणार आहे. तर पुढचे 5 ते 6 दिवस संचारबंदी कायम राहणार आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मात्र वेळ वाढवून मिळणार आहे. दरम्यान, अमरावतीतील दंगल भडकवल्याप्रकरणी अटकेत असणारे भाजप नेते अनिल बोंडेंसह (Anil Bonde Arrest) सर्व भाजप नेत्यांना दोन दिवसांपूर्वीच जामीन मंजूर झाला आहे. 


5. शिर्डीत साईदर्शनासाठी आजपासून ऑफलाईन दर्शन पास मिळणार, जिल्हाधिकाऱ्यांची साई संस्थानाला मुभा


कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील धार्मिक स्थळांसह शिर्डी साईबाबांचे मंदिर भाविकांना खुले झाले आहे. असे असले तरी अनेक दिवसांपासून साईदर्शनासाठी आतुरतेने वाट पाहणाऱ्या भाविकांना मात्र मनस्ताप सहन करावा लागतोय. ऑनलाइन पासची सक्ती, 10 वर्षाखालील खालील मुलांना दर्शनासाठी मनाई असल्याने भाविकांमध्ये असंतोष दिसुन येतोय. आपल्या 10 वर्षा खालील लहान मुलाला दर्शनासाठी घेऊन आलेल्या पालकांना जिथे जागा मिळेल तेथे रस्त्यावरच थांबून दर्शनासाठी वाट पाहावी लागण्याची वेळ आलीय.


पाहा व्हिडीओ : Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 16 नोव्हेंबर 2021 : मंगळवार : ABP Majha



6. केंद्रीय वित्तराज्यमंत्री भागवत कराड बनले देवदूत, दिल्ली ते मुंबई विमानप्रवासात वाचवले प्रवाशाचे प्राण, पंतप्रधान मोदींकडून कौतुक


7. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज नववा स्मृतिदिन, शिवाजी पार्कवर शिवसैनिकांची गर्दी होण्याची शक्यता, महाविकास आघाडीचे नेतेही अभिवादनासाठी उपस्थित राहणार


8. कोरोना संकटात लस कंपन्या मालामाल, फायझर, मॉडर्ना, बायोएनटेकची सेकंदाला एक हजार डॉलर्सची कमाई, पीपल्स व्हॅक्सिन अलायन्सचा अहवाल


9. स्वातंत्र्यापाठोपाठ राष्ट्रपिता महात्मा गांधींबाबत कंगनाचं वादग्रस्त वक्तव्य, गांधीजी सत्तेचे भुकेले आणि चलाक म्हणत निशाणा, तर भगतसिंगांना फाशी व्हावी ही गांधींची इच्छा असल्याचाही उल्लेख


10. जयपूरमध्ये आज भारत-न्यूझीलंड पहिला टी20 सामना, नवीन खेळाडूंसाठी चांगली संधी, प्रशिक्षक राहुल द्रविड यांचं मत