Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 11 मे 2021 मंगळवार | ABP Majha


1. मोठा दिलासा, राज्यात सोमवारी 61,607 रुग्ण बरे होऊन घरी, तर नवीन 37,326 रुग्णांचे निदान


2. मराठा आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारची राज्यपालांकडे धाव, आज मुख्यमंत्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना भेटणार


3. लसीकरण धोरणात सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करु नये, केंद्र सरकारचं न्यायालयात प्रतिज्ञापत्र


4. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळं कोवॅक्सिन लसीची महाराष्ट्रात निर्मिती करण्याचा मार्ग मोकळा, तर मुंबई महापालिका लसींसाठी जागतिक निविदा काढणार


5. रुग्णसंख्या घटत असल्यानं 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात येण्याची चिन्हं, उद्या होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे लक्ष



6. महाराष्ट्रात म्युकोरमायकॉसिसच्या रुग्णांवर महात्मा फुले आरोग्य योजनेतून मोफत उपचार, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती


7. गावदेवी परिसरातील पबमध्ये झालेल्या 'त्या' मारहाणीत आरोपपत्र दाखल, परमबीर सिंह यांच्यासमोरील अडचणी वाढल्या


8. तिरुपतीमधल्या सरकारी रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा खंडीत झाल्यानं 11 रुग्णांचा मृत्यू, नाशकातल्या दुर्घटनेची आठवण करुन देणारी घटना


9. एकीकडे रुग्ण दगावत असताना पीएम केअर फंडातून मिळालेली व्हेंटिलेटर धूळखात, नाशिकनंतर औरंगाबादमधला प्रकार उजेडात


10. कोविडनं आई-वडिलांचं छत्र हिरावलेल्या मुलांच्या संगोपनासाठी जिल्हास्तरीय टास्क फोर्स, राज्य सरकारचा पुढाकार