स्मार्ट बुलेटिन : 08 नोव्हेंबर 2021 : सोमवार : एबीपी माझा


महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.


1. एसटीचा संप चिघळण्याची चिन्हं, राज्यातील 250 पैकी 160 एसटी आगार बंद, संपाला पाठिंब्याबाबत 17 संघटनांची मुंबईत बैठक तर उच्चन्यायालयातही सुनावणी


जिथे रस्ता तिथे एसटी अशी ओळख असणाऱ्या लालपरीला मागील काही दिवसांपासून ब्रेक लागलाय. एसटीचं राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी आक्रमक झालेत. राज्यातील 250 पैकी 160 आगार सध्या बंद आहेत. आज आणखी बस डेपोतील कर्मचारीही संपात सहभागी होणार आहेत. त्यामुळे एसटी कर्मचारी संप चिघळण्याची शक्यता आहे. तिकडे मुंबईतही 17 एसटी कर्मचारी संघटनांची महत्वाची बैठक होतेय. याशिवाय एसटीचा प्रश्न आता न्यायालय दरबारी गेलाय. त्यामुळे उच्च न्यायालयातही याबाबत सुनावणी होणार आहे.


2. वारकरी बांधवांना मोठा दिलासा, यंदा कार्तिकी यात्रा होणार तर पंतप्रधान मोदींच्या ऑनलाईन उपस्थितीत आज पालखी मार्गाचं भूमिपूजन

3. मोहित कम्बोज हेच आर्यन खान किडनॅपिंग प्रकरणाचे मास्टरमाईंडं, दिवाळीनंतर नवाब मलिक यांचा पहिला बॉम्ब तर राष्ट्रवादीच्या नेत्यांचे ड्रग पेडलरशी संबंध, कम्बोज यांचा पलटवार

4. आर्यन खानला एनसीबीच्या एसआयटीकडून चौकशीसाठी समन्स, काल तब्येतीचं कारण देत अनुपस्थित, आज आर्यन एनसीबीसमोर जाणार का याकडे लक्ष

5. काही काळासाठी एकांतवासात जातोय, काही निर्णयांचा फेरविचार करण्याची गरज, खासदार अमोल कोल्हेंच्या फेसबुक पोस्टमुळं चर्चांना उधाण



6. सांगली जिल्हा बँकेच्या ठरावावरून तुंबळ हाणामारी; आमदार गोपिचंद पडळकरांची गाडी फोडली तर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचा पाय मोडला


7. आयात शुल्क कमी केल्यानं खाद्यतेलाचे भाव घटले, शेंगदाणा, सोयाबीन आणि सूर्यफुल्याच्या तेलाचे दर लिटर मागे 10 ते 15 टक्क्यांनी कमी, सर्वसामान्यांना दिलासा


8. दहिसर रिव्हर फेस्टमध्ये हजारोच्या संख्येने गर्दी, उपस्थितांकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन, शिवसेना नगरसेविकडून कार्यक्रमाचं आयोज


9. तामिळनाडूत पावसाची धुवांधार बँटिंग, मागच्या 24 तासातल्या पावसामुळं पूरस्थिती, पुढचे 2 दिवसही पावसाचा इशारा

10. अफगाणिस्तानवरील न्यूझीलंडच्या विजयानं टीम इंडियाचं टी-20 विश्वचषकातलं आव्हान संपुष्टात, आज भारताची नामिबियाविरुद्ध अखेरची साखळी लढत