1. ऐन रब्बीच्या हंगामात खतं महागली, आधीच अवकाळीच्या संकटाला सामोरं जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या खिशाला आणखी भार
2. महाराष्ट्र राज्य को. ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंची ईडीकडून 7 तास चौकशी, साखर कारखाना कमी किंमतीत खरेदी केल्याचा आरोप
3. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मोठ्या निर्णयाची शक्यता, ओबीसी आरक्षणाला स्थगिती, एसटी संप आणि शाळांबाबत सरकारच्या भूमिकेकडे लक्ष
Maharashtra Govt Cabinet Meeting : आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक (Maharashtra Govt Cabinet Meeting) दुपारी होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होणार आहे. आजच्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्यक्ष उपस्थित राहणार का? याकडे देखील लक्ष लागले आहे. दरम्यान आजच्या बैठकीत काही महत्वाचे निर्णय होऊ शकतात.
4. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 400 ओबीसी जागांवरच्या निवडणुकांना स्थगिती, 21 डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकांसंदर्भात आयोगाचा मोठा निर्णय, सरकारसमोर नवा पेच
5. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला महिना पूर्ण, बहुतांश कामगार अजूनही संपावर, पगारवाढीनंतरही संपकरी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम
St Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन अद्याप सुरुच आहेत. आज या संपाला एक महिना पूर्ण झाला. प्रशासनानं दिलेल्या पगारवाढीच्या आश्वासनानंतरही कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. 8 नोव्हेंबरला संपूर्ण राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ आणि विलीनीकरण या दोन मुख्य मागण्यांसाठी एल्गार पुकारला. एसटी कर्मचाऱ्यांचा इतिहासातील पहिलाच दीर्घकालीन संप असल्याचं बोललं जातंय. एस.टी. महामंडळाच्या 61 वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासातील इतके दिवस चालणारं हे विक्रमी आंदोलन ठरलं आहे. आधीच तोट्यात असणाऱ्या महामंडळाला आंदोलनामुळे थोडा थोडका नाहीतर तब्बल 450 कोटींहून अधिक फटका बसला.
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 08 डिसेंबर 2021 : बुधवार
6. कोंकणी भाषेतील साहित्यकार दामोदर मावझो यांना 57वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर
7. 'राज्यकर्त्यांना माफी मागण्याचे व्यसन जडले', केंद्र सरकारवर शिवसेनेचं मुख्यपत्र सामनातून हल्लाबोल
8. ओमायक्रॉनचा प्रसार वाढला तर लहानग्यांना संसर्गाची शक्यता, डब्ल्यूएचओची माहिती, ओमायक्रॉन अति सौम्य, घाबरु नका, व्हेरियंट शोधणाऱ्या डॉक्टरांचा दिलासा
9. कोरोनातून बरं झालेल्या रुग्णांमध्ये ओमायक्रॉनचा तिप्पट वेगानं संसर्ग, जागतिक आरोग्य संघटनेच्या सौम्या स्वामीनाथन यांची माहिती, लहानग्यांबाबतही WHOचा इशारा
10. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची आज घोषणा, उपकर्णधारपद रहाणेकडून रोहित शर्माकडे जाण्याची शक्यता