स्मार्ट बुलेटिन | 06 नोव्हेंबर 2021 | शनिवार | एबीपी माझा


 

1. ऐन दिवाळीत पावसाचा बेरंग, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नाशिकसह राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस, पुढचे दोन दिवस पावसाचे
 
2. संप मागे घ्या अन्यथा ताब्यात घेऊ, हायकोर्टात संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना इशारा, आजच भूमिका स्पष्ट करण्याचेही निर्देश
 
3. आर्यन खानसह अन्य पाच प्रकरणाचा तपास दिल्ली एनसीबी करणार, विशेष तपास पथक मुंबईत येणार, उपमहासंचालक संजय सिंह यांच्याकडे तपासाची धुरा

4. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ईडी कोठडी संपल्यानंतर आज कोर्टात हजेरी, ईडी पुन्हा कोठडीची मागणी करणार

5. डहाणू पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस अधिकाऱ्यांच्या कारनं पादचाऱ्यांना उडवलं, अपघातात दोघे जखमी, एपीआय सुरेश खरमाटे ताब्यात


पालघर : पालघर जिल्ह्यात डहाणूमध्ये भरधाव गाडीनं पादचाऱ्यांना उडवल्याची (Hit and Run case in Palghar) दुर्घटना घडली आहे. गाडी चालवणारा पोलीस अधिकारी असल्याचं सांगण्यात येतंय. चिंचणी ते डहाणू प्रवास करताना चालकानं बाजूनं चालत असलेल्या पती-पत्नीला धडक दिली. अपघातानंतर चालक फरार झाला अशी माहिती पोलीस उपअधीक्षकांनी दिली.  ही गाडी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास खारमाटे यांच्या नावावर आहे.  डहाणू पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक  सुहास खारमाटे यांच्या विरोधात  वाणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तारापूर ते डहाणू पोलीस ठाण्यापर्यंत भरधाव गाडी चालवून अपघात करून काहींना जखमी केल्याची घटना समोर आली आहे. त्यातील एकाची प्रकृती ही चिंताजनक असल्याने त्या व्यक्तीला नानावटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.



6. अंबानी कुटुंबीय लंडनच्या स्टोक पार्कमध्ये शिफ्ट होणार नाही, रिलायन्सचं स्पष्टीकरण, प्रीमियर गोल्फिंग, स्पोर्टिंग रिसॉर्ट उभारण्यासाठी मालमत्ता खरेदी केल्याचा दावा

7. पाडव्याच्या दिवशी आक्रोश, आंघोळीसाठी गेलेल्या तीन मुलींचा बुडून दुर्दैवी मृत्यू, सांगलीतील घटनेनं हळहळ

8. देशभर आज भाऊबीजचा उत्साह, मुंबईत बेस्टकडून महिला प्रवाशांना खास भेट, शंभर लेडीज फर्स्ट स्पेशल बसेस धावणार

9. टी-20 विश्वचषकात के.एल.राहुलच्या धुवाधार खेळीमुळे टीम इंडियाला बळ, स्कॉटलंडवर 8 गडी राखून विजय, नेट रनरेटमध्ये सुधारणा

10. आथिया शेट्टीबरोबरच्या अफेअरची केएल राहुलकडून कबुली, आथियासोबतचा फोटो केला पोस्ट
Athiya Shetty and KL Rahul relationship : भारताचा धडाकेबाज सलामीवीर फलंदाज के. एल. राहुलनं अखेर आथिया शेट्टीबरोबरच्या नात्यावर कबुली दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून आथिया आणि क्रिकेटपटू के. एल राहुल यांच्या नात्यांबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरु होती. दोघांना अनेक ठिकाणी स्पॉटही करण्यात आलं होतं. दोघांकडून आपल्या नात्यांवर मौन बाळगण्यात आलं होतं. मात्र, स्कॉटलँडविरोधच्या सामन्यानंतर आथिया शेट्टीच्या वाढदिवासचं औचित्य साधत राहुलनं आपल्या नात्याचा खुलासा केला आहे. राहुलनं दोघांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या नात्यावर खुलासा केलाय.