स्मार्ट बुलेटिन | 05  नोव्हेंबर 2021 | शुक्रवार | एबीपी माझा


महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.

 

1.मुंबई उच्च न्यायालयाच्या तंबीनंतरही एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम, आजच्या सुनावणीकडे लक्ष

2. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे पुत्र हृषिकेश देशमुख ईडीच्या रडारवर, चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स

Money Laundering Case : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना अटक केली आहे. पण देशमुख कुटुंबियांच्या अडचणी आता आणखी वाढल्या आहेत. ईडीनं अनिल देशमुखांचे पुत्र ऋषिकेश देशमुख यांना चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक झाल्यानंतर आता त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख ईडी (ED) च्या रडारवर असल्याची माहिती समोर येत आहे. अनिल देशमुखांचे सर्व पैशांचे व्यावहार मुलगा ऋषिकेश पाहात असल्याचं तपासात उघड झालं आहे, त्यामुळं ईडीनं ऋषिकेश देशमुख यांना चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. 

3. धनत्रयोदशीनंतर  दिवाळी पाडव्याकडून बाजारपेठेच्या मोठ्या अपेक्षा, सोनं, वाहन, घर खरेदीला सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता, गुळ आणि हळदीच्या सौद्यांकडेही लक्ष

4. दिवाळीसाठी भारतीयांचा स्वदेशीचा नारा, चीनी वस्तूंकडे आवर्जून पाठ, ड्रॅगनला 50 हजार कोटींचा फटका

5. केदारनाथ यात्रेदरम्यान पंतप्रधान मोदी 400 कोटींच्या योजनांची घोषणा करणार, शंकराचार्याच्या मूर्तीचंही अनावरण करणार, एकाचवेळी देशभरात कार्यक्रमाचं आयोजन
 
6. गोविंदबागेत दिवाळीचा मेळा, पवार कुटुंबियांच्या भेटीला राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते बारामतीत

7. सर्वसामान्यांना दिलासा, आज पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल नाही, मुंबईत पेट्रोल 109.98 रुपये प्रति लिटर, तर डिझेल  94.14 रुपये प्रति लिटर

8. भाऊबीजेपूर्वी बहिण भावावर काळाचा घाला, हिंगोलीच्या वसमतमध्ये भीषण अपघातात बहिण-भावाचा मृत्यू

8. पश्चिम बंगालचे मंत्री सुब्रत मुखर्जी यांचे निधन, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींकडून शोक व्यक्त

10. विराट कोहलीच्या वाढदिवशी टीम इंडियाची स्कॉटलँडशी लढत, सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी मोठ्या फरकानं विजयाची गरज