Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 03 जून 2021 गुरुवार | ABP Majha
1. बुधवारी राज्यात कोरोनाच्या 15,169 नव्या रुग्णांची नोंद तर 29,270 रुग्ण बरे होऊन घरी परतले, रिकव्हरी रेट 94.54 टक्क्यांवर
2. आज मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता, महाराष्ट्रात 11 जूनपर्यंत आगमन होण्याचा अंदाज, तर राज्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व सरींची हजेरी
3. मुंबईतल्या सरकारी केंद्रावर आज लसीकरण बंद राहण्याची शक्यता, महापालिकेला लसीच्या पुरवठ्याची प्रतीक्षा, खासगी रुग्णालयात लसीकरण सुरु राहणार
4. . बारावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर राज्य मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब, तर बारावीच्या परीक्षेसंदर्भात केंद्र सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडणार
5 .लस खरेदीची आत्तापर्यंतची आकडेवारी सर्व तपशिलांसह सादर करा, सुप्रीम कोर्टाचे केंद्र सरकारला आदेश
6. भारत-पाक सीमेवर शस्त्रसंधीला मोठं यश, 100 दिवसांपासून गोळीबार नाही
7. कोरोनामुक्तीनंतर श्रवण क्षमतेवर परिणाम होत असल्याचं उघड, 5 टक्के रुग्णांमध्ये लक्षण आढळल्यानं वैद्यकीय क्षेत्रासमोर नवं आव्हान
8. पुलवामाच्या त्रालमध्ये भाजप नगरसेवक राकेश पंडिता यांची दहशतवाद्यांकडून हत्या, घरात घुसून गोळीबार
9. ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी 41 तालुक्यात 82 वसतिगृह; राज्य सरकारचा निर्णय
10. राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार विजेत्या हाली बरफला तहसील कार्यालयात हंगामी नोकरी, माझाच्या बातमीनंतर प्रशासनाकडून दखल, धान्य देण्याचेही आदेश