स्मार्ट बुलेटिन | 01 नोव्हेंबर 2021 | सोमवार | एबीपी माझा
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. इंधन दरवाढीचा कहर, मध्य प्रदेशात पेट्रोल 120 रुपये तर परभणीत पेट्रोल 118रुपयांवर, ऐन दिवाळीत जीवनावश्यक वस्तू महागल्या
2. निर्बंध शिथिल झाल्यानं यावर्षी राज्यभरात दिवाळी पहाटचं आयोजन, पुणे-नाशकात दिवाळीची सुरेल सुरुवात
3. दिवाळीनिमित्त मुंबईसह राज्यभरातील बाजारपेठांमध्ये उत्साह, खरेदीसाठी नागरिकांची लगबग, फराळासह गोडपदार्थ घेण्यासाठी झुंबड
4. वसुबारसनिमित्त गाय-वासराच्या पूजनानं दिवाळीला सुरुवात, देवाची आळंदीही सजली, तर अयोध्येत आजपासून दीपोत्सव
5. लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना आता लोकलचं तिकीट मिळणार, मुंबईकरांना सरकारची दिवाळी भेट, दिवसभराच्या प्रवासासाठी पूर्वीप्रमाणे तिकीट उपलब्ध होणार
6. दाऊद वानखेडे आहे हे सिद्ध करुन दाखवल्यास पाकिस्तानात जाईन, समीर वानखेडेंच्या वडिलांचं मलिकांना आव्हान, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष वानखेडे कुटुंबाच्या भेटीला नुकत्याच
7. नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीतील 2 हजार 897 उमेदवारांची नियुक्ती रद्द, अप्पर पोलीस महासंचालकांचा निर्णय, एकापेक्षा अधिक ठिकाणी अर्ज केल्यानं कारवाई
8. आरोग्य विभागाच्या परीक्षेत सावळागोंधळ सुरुच, भंडारा जिल्ह्यात पेपर फुटल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप, तर अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिल्याचाही दावा
9. हवामान बदलांबाबत लक्ष्य गाठायचं असेल तर भारताला एनएसजीमध्ये स्थान आवश्यक, अणुपुरवठादार गटामध्ये स्थान मिळवण्यासाठी भारताची मुत्सद्दी भूमिका
10. टी20 विश्वचषकात टीम इंडियाचा सलग दुसरा पराभव, न्यूझीलंडचा 8 गडी राखून विजय, भारताच्या सेमीफायनल गाठण्याच्या आशा जवळपास संपुष्टात