१. कोरोनाच्या सावटात नववर्षाचं जगभरात जल्लोषात स्वागत, नववर्षाच्या पहिल्या दिवशी एबीपी माझावर घरबसल्या देवदर्शन
New Year 2022 Celebration in Maharashtra Temple : नवी स्वप्न आणि आशाआकांक्षांसह नववर्षाचा सूर्योदय झाला आहे. जगभरात नववर्षाचं जल्लोषात स्वागत केलं जातंय. एकीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झालीय. संकट वाढल्यानं मंदिरात गर्दी टाळणं गरजेचं आहे. मात्र तरीही राज्यभरातील प्रमुख मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भाविकांनी शिर्डीत मोठी गर्दी
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भाविकांनी शिर्डीत मोठी गर्दी केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काल रात्री 9 वाजता मंदिर बंद करण्यात आलं होतं. आज सकाळी 6 वाजेपासून साईदर्शन पुन्हा झालंय. कडाक्याच्या थंडीतही भाविक साई दर्शनासाठी आतूर आहेत. नववर्षानिमित्ताने साई मंदिरात आकर्षक फुलांची सजावट कऱण्यात आली आहे. जमावबंदीचे आदेश धुडकावत भाविकांचा जल्लोष यावेळी पाहायला मिळाला. साई मंदिर परिसरात प्रवेश बंदी असताना रस्त्यावर भाविकांची गर्दी आहे. साई मंदिर बंद असल्याने भाविकांचा हिरमोड होताना दिसून येतोय.
२. लहान मुलांच्या लसीकरणासाठी आजपासून कोविन अॅपवर नोंदणी, १५ ते १८ वयोगटातील मुलांचं ३ जानेवारीपासून लसीकरण, सध्या कोव्हॅक्सिन लशीचा पर्याय
३. नववर्षाचा पहिला दिवस अन्नदात्याला समर्पित; 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 20 हजार कोटी हस्तांतरित होणार
४. राज्यात काल दिवसभरात ८ हजारहून अधिक रुग्ण, मुंबईतील बाधितांचा आकडा ५ हजारहून अधिक, ७० टक्के रुग्णांमध्ये डेल्टा व्हेरियंट आढळल्यानं चिंतेत वाढ
५. पुण्यातील आंबेगाव आणि मावळ तालुक्यातील बैलगाडा शर्यती रद्द, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय
६. कटराच्या वैष्णो देवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी, २ महिलांसह १२ भाविकांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना २ लाख तर जखमींना ५० हजारांची मदत जाहीर
Stampede at Mata Vaishno Devi Bhawan: जम्मू (Jammu)मधील कटरा (Katra) येथील वैष्णोदेवी मंदिरामध्ये रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत 12 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींवर नारायणा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी वैष्णो देवी मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती. रात्रीच्या सुमारास अचानक गोंधळ झाल्यानं चेंगराचेंगरी झाली. पंतप्रधान मोदी यांनी या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. सरकारकडून दुर्घटनेत मृत पावलेल्या भाविकांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये प्रत्येकी तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत घोषित केली आहे. शिवाय मदतीसाठी हेल्पलाईन नंबर देखील जारी करण्यात आला आहे.
७. भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिनानिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यातून आंबेडकरी अनुयायी दाखल, अजित पवार, प्रकाश आंबेडकरांकडून अभिवादन, पोलिसांचा फौजफाटा तैनात
८. समृद्ध महाराष्ट्र, बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया, आव्हानांवर मात करूया; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आवाहन
९. नव्या वर्षाची सुरुवात नव्या नियमांसह, एटीएममधून पैसे काढणं महागणार, जीएसटी दर वाढल्याने चपलाही महाग, आरक्षण नियमातही बदल
१०. दक्षिण आफ्रिकेतील एकदिवसीय क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, अनफिट रोहित शर्माच्या गैरहजेरीत के. एल. राहुलकडे कर्णधारपद, जसप्रीत बुमरा उपकर्णधार