1. एटीएममधून पैसे काढण्यावर निर्बंध येण्याची शक्यता, 2 व्यवहारांमध्ये 6 ते 12 तासांची मर्यादा आणण्याबाबत लवकरच निर्णय


 

  1. चालक, नोकरचाकर आणि स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तींनाही पीएफचा लाभ मिळणार, लवकरच केंद्र सरकारची नवी योजना येणार


 

  1. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बेमुदत उपोषणाला सुरुवात, तर येत्या 2 दिवसात मागण्या पूर्ण होणार असल्याचं महापौर महाडेश्वरांचं आश्वासन


 

  1. येत्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात विरोधी पक्षनेता नसेल, औरंगाबादेत मुख्यमंऱ्यांकडून विरोधकांची खिल्ली


 

  1. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात अजित पवारांसह संचालक मंडळाची सूप्रीम कोर्टात धाव, मुंबई हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी


 

  1. काश्मीर सोडा पण पाकिस्तानला मुझफ्फराबादही वाचवणं कठीण, पाक पीपल्स पक्षाच्या बिलावल भुट्टोंचा पंतप्रधान इमरान खान यांना घरचा आहेर


 

  1. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या बंगल्यात गृहमंत्री अमित शाह यांचा गृहप्रवेश, 2004 नंतर अटलजींचं 14 वर्षे या बंगल्यात वास्तव्य


 

8.खंडणीखोरांवर कारवाई व्हावी असे म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंच्या सभेत खंडणी मागणारा फरार पदाधिकारी, नागपूर येथील आदित्य संवाद कार्यक्रमातील घटना

  1. बेजबाबदार वाहनचालकांच्या संख्येत वाढ, मुंबई पोलिसांच्या कारवाईत 138 कोटींचा दंड वसूल


 

  1. अभिनेते प्रविण तरडे यांच्या गाडीला पुण्याजवळ अपघात, सुदैवाने कुणालाही गंभीर दुखापत नाही


व्हिडीओ :