Sharad Pawar Supriya Sule ABP Majha Mahakatta : शरद पवार (Sharad Pawar) हे संकटाच्या आणि संघर्षाच्या काळात कधीच अस्वस्थ नसतात. उलट या काळात ते अधिक सक्षम असतात असं मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं. ज्यावेळी आम्ही खुष असतो, त्यावेळी ते दु:खी असतात असे सुळे म्हणाल्या. ज्यावेळी संघर्ष येतो त्यावेळी ते जास्त खुष असतात असेही सुळे म्हणाल्या. शरद पवार यांनी केलेल्या कामांचा मला अभिमान असल्याचे सुळे म्हणाल्या. मोजके बोलणे शरद पवार यांनी आवडते असेही सुळे म्हणाल्या. 


लोक हेच शरद पवार यांचे टॉनिक


शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी एबीपी माझाच्या माझा महाकट्ट्यावर हजेरी लावली. त्यावेळी त्या बोलत होत्या. लोक हेच शरद पवार यांचे टॉनिक आहे. त्यामुळं ते लोकांमध्ये फिरत असतात असे सुळे म्हणाले. आदर्श वडिलांपेक्षा शरद पवार हे आदर्श आजोबा असल्याचेही सुळे म्हणाल्या. शरद पवार हे कामासाठीच जन्माला आल्याचे शरद पवार म्हणाले.


उद्धव ठाकरे आम्हाला नेहमी चिडवतात


उद्धव ठाकरे आम्हाला नेहमी चिडवतात. ते भेटले की विचारतात बाबा कुठे गेले? आम्ही सांगतो दौऱ्यावर गेले. उद्धवजी म्हणतात, तुम्ही त्यांच्याशी नीट वागत नाहीत म्हणून ते दौऱ्यावर जातात असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. मी शाळेत असताना शरद पवार शाळेच्या कार्यक्रमात येत होते. मात्र, आले तरी ते मुख्यमंत्री म्हणून कधीच आले नाहीत, ते सामान्य पालकासारखे येत होते. ते येऊन मागे बसायचे असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. 


तुम्हाला राजकारणात काय व्हायचंय? सुप्रिया सुळे म्हणाल्या...


दरम्यान, या कार्यक्रमात तुम्हाला राजकारणात काय व्हायचंय? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना विचारण्यात आला. यावेळी बोलता सुळे म्हणाल्या की, मला संसदेत महाराष्ट्राचा मधु दंडवते होण्याची फार इच्छा आहे. जिथे त्यांचं नाव आहे तिथे नेहमी मला असं वाटतं की आपलं देखील नाव त्या बोर्डावर लागलं पाहिजे असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. तर महिवाकास आघाडीचं सरकार आलं तर सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा सुरु आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं? असा पवारांना विचारण्यात आले, त्यावेळी पवार म्हणाले की, इथं काहीही झालं तरी राज्य सरकार आमच्या लोकांच्या हातात आलं पाहिजे आणि आम्ही ते आणणार. एकदा हे ठरवलं की अ ब क व्यक्ती महत्वाची नाही. तो एकत्र  निर्णय होईल. अर्जुनाला जसा माशाचा डोळा, तशी आमच्या मनात महाराष्ट्राची सत्ता, बाकी काही नाही असे पवार म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या:


मराठा-ओबीसी वाद, शरद पवार अखेर मैदानात, बीड जालन्यात जाऊन तळ ठोकणार, माझा महाकट्टावर भूमिका मांडली!