American MP Shri Thanedar Majha Katta: अमेरिकेतल्या मिशिगन प्रांतातून निवडून आलेले श्री ठाणेदार अमेरिकेतले पहिले मराठी खासदार आहेत. बेळगाव ते अमेरिकेच्या संसदेपर्यंतचा त्यांचा प्रवास आज त्यांनी माझा कट्ट्यावर सांगितला आहे. श्री ठाणेदार अमेरिकेत कसे गेले आणि त्यानंतर महासत्तेच्या संसदेपर्यंत कसे पोहोचले. याबद्दल त्याने माझा कट्ट्यावर दिलखुलासपणे सांगितलं आहे. अमेरिकेत खासदार म्हणून निवडणून आपल्यावर पहिल्यांदा त्यांच्या मनात काय भावना आल्या, यावर बोलताना ते म्हणाले आहेत की, ''मी निवडणून आल्यावर मला माझ्या आईची आठवण आली. मला माझ्या आईने शिकवलं आहे, कधीही परवभाव स्वीकारून शांत बसायचं नाही. कितीही कठीण परिस्थिती आली तरी त्याला सामोरे जायचं.'     


आपल्या अमेरिकेतील प्रवासाबद्दल सांगताना ते म्हणाले की, मी अमेरिकेत आलो तेव्हा मी 24 वर्षांचा होतो. त्यावेळी काहीच माहित नव्हतं. कोणीही ओळखीचं नव्हतं. त्याकाळात भारतातून अमेरिकेला फारसे लोक येत नव्हती. मराठी लोक खूपच कमी होते. अमेरिकेत येताना व्हिसा मिळायला देखील मला खूप त्रास झाला. अमेरिकेत येण्यासाठी चार वेळा व्हिसा मला नाकारण्यात आला. नंतर चौथ्यांदा नाकारण्यात आलेले कागदपत्रे मी पाचव्यांदा त्यांना परत पाठवले आणि त्यांनी ते मंजूर केले. ज्या मॅडमने माझे कागदपत्रे नाकारले होते, त्या सुट्टीवर गेल्यावर माझे कागदपत्रे स्वीकारण्यात आले. अशा अवघड परिस्थिती मी अमेरिकेत आलो.              


यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, अमेरिकेत मी एक विद्यार्थी म्हणून आलो आणि आज मी येथील जवळपास 10 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत आहे. अमेरिकेच्या यूएस काँग्रेसमध्ये काम करण्याची ही एक छान भावना आहे. अमेरिकन लोकांनी एका परक्या माणसावर, जो माणूस आपल्या सारखा दिसत नाही. आपल्या सारखा बोलत नाही. अशा माणसाला त्यांनी संधी दिली. यासाठी इथल्या लोकांचे मी आभाव मानतो, असं ते म्हणाले आहेत. 


ते पुढे म्हणाले की, ''मी अमेरिकेत 1980 साली आलो. त्यावेळी भारतात फारशा काही सवलती नव्हत्या. चांगल्या नोकऱ्या मिळायच्या नाही. माझ्या कुटुंबीयांचं काहीतरी भलं व्हावं, त्या उद्देशाने मी अमेरिकेत आलो. अमेरिकेत आपल्यानंतर मी पीएचडी केली. नोकरी केली. मग वाटलं आपलं स्वतःचं काहीतरी असावं, म्हणून व्यवसाय सुरु केला. व्यवसायही खूप मोठा झाला. जवळपास 500 लोक माझ्या केमिकल टेस्टिंग कंपनीत कामाला होते. 65 पीएचडी झाले. यामुळे व्यवसाय आणखी वाढला. त्यावेळी असं वाटलं आपल्याकडे काही नसताना आपण या देशात आलो आणि या देशाने आपल्याला खूप काही दिलं.'' ते म्हणाले, ''या देशाने मला भरभरून दिलं. इथले 25 ते 30 टक्के लोक गरिबीत जगत आहे. ज्या देशाने आपल्या इतकं काही दिलं. त्याचं आपणही देणं लागतो, अशी भावना माझ्या मनात त्यावेळी निर्माण झाली. त्यानंतर मला असं वाटलं की आता आपण कंपनी आणि पैसे मिळवणं बंद करायला हवं. आपण लोकांसाठी काम करावं. हे करण्यासाठी मला राजकारण हा सर्वात योग्य मार्ग वाटला. म्हणून मी गव्हर्नरची निवडणूक लढलो. मात्र यात माझा पराभव झाला. यानंतर मी आमदारकीची निवडणूक लढवली आणि ती जिंकलो.