ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 फेब्रुवारी 2026 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 फेब्रुवारी 2026 | रविवार
1) टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजपचं आक्रमक आंदोलन, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांला दगड लागल्यानं जखमी, कार्यकर्ते आमने सामने https://tinyurl.com/3rcv7p9a पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरेंसह धीरज घाटेंना अटक करा, नाहीतर पोलिसांनी बांगड्या घालून घरी बसावं, भाजपच्या आंदोलनावरुन काँग्रेस कार्यकर्ते पोलिसांवर संतापले https://tinyurl.com/3n3cranj
2) देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रात दंगली घडवायच्या आहेत, 'ध' चा 'मा' करुन माझ्या वक्तव्याची मोडतोड, हर्षवर्धन सपकाळांचं वक्तव्य, म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची शान https://tinyurl.com/5xutcv77 हर्षवर्धन सपकाळांच्या तोंडाला काळे फासणाऱ्याला एक लाखाचे बक्षीस, टिपू सुलतान प्रकरणावरुन मराठा ठोक मोर्चा आक्रमक https://tinyurl.com/4jj567ad हर्षवर्धन सपकाळांनी महाराष्ट्राची आणि शिवप्रेमींची जाहीर माफी मागावी, मनसे आक्रमक, सपकाळांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध https://tinyurl.com/4k9u5fpw शिवाजी महाराज देशात नव्हे तर जगात महान, त्यांची तुलाना कुठल्याच राजांशी होऊ शकत नाही; हर्षवर्धन सपकाळ यांच्या मतांशी नाना पटोलेंची फारकत https://tinyurl.com/3zfvwpsv
3) आमच्या पक्षाकडे शरद पवारांचं नेतृत्त्व, स्वतंत्र अस्तित्त्व पण कधीही वेळ पडल्यास सुनेत्रा पवारांच्या मदतील जाऊ, जयंत पाटील यांचं वक्तव्य https://tinyurl.com/49k5vbt2 खाली पडलेलं विमान, लोकांची गर्दी, इतक्यात स्फोटाचा आवाज, अजितदादांच्या विमान अपघाताचा आणखी एक व्हिडीओ समोर https://tinyurl.com/2mrn5sdm
4) जागा कमी आल्या म्हणून अध्यक्षपद सोडणार नाही, सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच होणार, मंत्री जयकुमार गोरेंचा दावा https://tinyurl.com/bdes2nsb धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला; शिवसेनेचा भाजपला प्रस्ताव, फडणवीस-शिंदे लवकरच घेणार निर्णय https://tinyurl.com/3h6pcrrs
5) टिपू सुलतानला नायक मानणाऱ्या पाकिस्तानशी क्रिकेट कशाला खेळता? खासदार संजय राऊतांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सवाल https://tinyurl.com/bd8u6hpw जिल्हा परिषद निवडणुकीच्या वादावरुन काँग्रेस अन् ठाकरेंचे कार्यकर्ते भिडले, धाराशिवमध्ये भर चौकात सिनेस्टाईल मारामारी https://tinyurl.com/ye23nhkc
6) आदिवासी विभागातला लाचखोर लिपिक राजेंद्र ढेरंगेंची चौकशी करुन बंद लिफाफ्यात वस्तुनिष्ठ अहवाल सादर करा, मंत्री नरहरी झिरवाळ यांचे निर्देश https://tinyurl.com/2mvwup4h राज्यभरात एटीएसकडून धाडींचं सत्र, यवतमाळमध्ये 14 तर अहिल्यानगरमध्ये 7 ठिकाणी छापेमारी, अनेकांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु https://tinyurl.com/3d7bxczk
7) रस्त्यावरून जाणाऱ्या मुली पाहून नजर फिरली, दुचाकीस्वाराने मागून येत केला छातीला स्पर्श, अकोल्यात संतापजनक घटना https://tinyurl.com/2vbun6b5 इन्स्टाग्रामवरनं मैत्री अन् प्रेम, फॉलोअर्सच्या दुनियेत रमणाऱ्या पत्नीला पतीनेच संपवलं, धक्कादायक घटनेनं गोंदिया हादरलं https://tinyurl.com/ek5nse5x
8) हा देश कोणाच्या बापाची जहागीर नाही, अनेक आले आणि अनेक गेले, हे सुद्धा निघून जातील, एमआयएमचे खासदार अकबरुद्दीन ओवैसींची पंतप्रधान मोदींवर टीका https://tinyurl.com/4pshe8w4
9) बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव 10 दिवसांत जेलबाहेर? सलमान खानने मदतीसाठी चक्रं फिरवल्याची चर्चा, व्हायरल व्हिडीओमागचं सत्य काय? https://tinyurl.com/32c4rujn धनुषसोबतच्या लग्नाच्या चर्चांवरुन अक्षय कुमारनं चिडवलं, मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूरनं प्रेमसंबंधांबाबत थेटच सांगून टाकलं https://tinyurl.com/yf9y8b5e
10) वेस्ट इंडिजची गाडी सुसाट, नेपाळला पराभूत करत विजयी हॅट्रिक, सुपर-8 चं पहिलं तिकीट कन्फर्म https://tinyurl.com/ye3cz9nc आज कोलंबोत रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा थरार, वेगवान गोलंदाजीत बुमराहसह टीम इंडियाची प्लेईंग 11 कशी असणार? https://tinyurl.com/2zcfmcne
वर्ल्डकपच्या IND vs PaK सामन्यापूर्वी टीम इंडियाने विजयाचा गुलाल उधळला; आशिया कपमध्ये भारतीय महिला संघाने केला पाकिस्तानचा पराभव https://tinyurl.com/3es578nn
एबीपी माझा Whatsapp Channel
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658
























