स्मार्ट बुलेटिन | 23 जुलै 2020 | गुरुवार | एबीपी माझा

जगभरात कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 53 लाखांवर, तर भारतात 12 लाख 39 हजार पार

पुणे जिल्ह्यात कोरोनाचा कहर, गेल्या 24 तासांमध्ये पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 3218 नवीन रुग्णांची नोंद

सांगलीतील 400 वर्षे जुना वटवृक्ष वाचवला, महामार्गाची रचना बदलून बायपासला पर्याय शोधण्याचा एनएचएआयचा निर्णय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनात 60 वर्षांवरील आमदार उपस्थित राहु शकतील का? सरकार दरबारी चर्चा सुरु



नववी आणि अकरावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्याची आणखी एक संधी, शिक्षण विभागाचा निर्णय जारी

'जय श्रीराम' लिहिलेली 10 लाख पत्रं शरद पवारांना पाठवणार, भाजपा युवा मोर्चाकडून राज्यभर अभियान

बीडमध्ये अंगणवाडी महिलांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर प्रकल्प अधिकार्‍याने टाकला स्वतःचा नग्न फोटो, अधिकारी निलंबित

सलून व्यवसायिकांचं कैचीला कुलूप लावून निषेध आंदोलन; पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडे आर्थिक मदतीची मागणी

अमेरिकन कंपन्यांसाठी भारतात गुंतवणूकीचे पर्याय उपलब्ध, इंडिया आयडियाज शिखर समिटमध्ये पंतप्रधानांचे आवाहन

प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळाचा शेवट चांगला होऊ शकला असता, कोहलीसोबतच्या वादावर अनिल कुंबळेचं वक्तव्य