देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. महाराष्ट्रात राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाला परवानगी, सध्या सुरु असलेल्या 200 विशेष गाड्यातूनच प्रवास करण्याची मुभा, आजपासून तिकीट बुकिंगला सुरुवात
2. अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत आज निर्णयाची शक्यता, पुन्हा एकदा कुलगुरु समितीची बैठक, मुदतवाढीसाठी यूजीसीला मागणी करण्याची शक्यता
3. कोरोना काळातील कर्जावरील व्याज रद्द होणार की नाही याचा आज सुप्रीम कोर्टात निर्णय, तर दोन वर्षांसाठी कर्जवसुलीला स्थगिती शक्य, केंद्र सरकारची माहिती
4. ऑगस्ट महिन्यात पुणे, नाशिक, नागपूरसह इतर शहरांमध्ये कोरोनाचा कहर, मृतांच्या संख्येत शेकडोने वाढ, आरोग्ययंत्रणेसमोर मोठं आव्हान
5. विदर्भातील जिल्ह्यांना पुराचा वेढा कायम, हजारो कुटुंबांचे संसार पाण्यात, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज विदर्भ दौऱ्यावर
6. एनबीसीकडून आणखी एका तस्कराला मुंबईतून अटक, रियाचा भाऊ शौविकशी संबंध असल्याचा ड्रग तस्करांचा दावा, आज पुन्हा रियाची सीबीआयकडून चौकशी
7. बाबरी विद्ध्वंस प्रकरणी आजपासून सीबीआय विशेष न्यायालयाकडून निकाल वाचन, अडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशींसह 32 जणांवर आरोप
8. पूर्व लडाखमध्ये भारत चीन सैन्यामध्ये तणाव, दोन्ही देशांचे रणगाडे फायरिंग डिस्टन्समध्ये, तोडगा काढण्यासाठी दिल्लीत उच्चस्तरिय बैठक
9. माजी रणजीपटू आणि फिटनेस ट्रेनर शेखर गवळी नाशिकमधल्या इगतपुरीत ट्रेकिंगदरम्यान दरीत कोसळले, सुमारे 14 तासांच्या शोधमोहीमेनंतर मृतदेह सापडला
10. कंगणा रणौतचा करण जोहरवर पुन्हा हल्लाबोल, चित्रपट माफियांमधील मुख्य आरोपी असल्याचा उल्लेख, ट्वीटमध्ये पंतप्रधान मोदींनाही टॅग