Abhishek Ghosalkar Firing Case : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची गुरूवारी गोळ्या झाडून हत्या (Mumbai Dahisar Firing) करण्यात आली, याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलंय. घोसाळकरांच्या मृत्यूनंतर त्यांचे पार्थिव जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले होते, ज्यानंतर घोसाळकर यांचा प्राथमिक शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू हा अतिरक्तस्त्राव तसेच हॅमरेज शॉकमुळे झाल्याचं डॉक्टरांनी अहवालात म्हटलंय.


 


घोसाळकरांच्या शवविच्छेदन अहवालात काय म्हटलंय?


ठाकरे गटाचे अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू हा अतिरक्तस्त्राव आणि हॅमरेज शॉकमुळे झाल्याचं जे. जे. रुग्णालयातील शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात म्हटलंय. या घटनेत घोसाळकर यांना चार गोळ्या लागल्याचं समोर आलं आहे. जेव्हा मॉरिसनं त्यांच्यावर गोळीबार केला, तेव्हा ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी बोरिवली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केलं. 


 


नेमकं प्रकरण काय?


अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस नोरोन्हा गुरुवारी संध्याकाळी एकत्र फेसबुक लाईव्ह करत होते. मॉरिसने घोसाळकरांना त्याच्या कार्यालयात बोलावलं होतं. या दोघांनी यापुढे एकत्र काम करण्याचं ठरवलं. तब्बल 40 मिनिटे हे फेसबुक लाईव्ह सुरू होतं. फेसबुक लाईव्ह जेव्हा संपत आलं होतं, शेवटच्या क्षणी मॉरिस नोरोन्हा हा व्हिडीओतून बाजूला झाला, मॉरिस खोलीतून बाहेर गेला, पिस्तुल काढलं, आणि पुन्हा खोलीत शिरून त्याने घोसाळकरांवर गोळीबार केला. त्यात अभिषेक घोसाळकर यांची प्रकृती गंभीर झाली. गोळीबारामुळे अभिषेक घोसाळकर जमिनीवर कोसळले. त्यांना तातडीनं करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काही मिनिटांत त्यांच्यावर गोळ्या काढण्याची शस्त्रक्रिया सुरू झाली. मात्र अति रक्तस्त्राव झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला.


पैशाच्या वादातून गोळीबार


मॉरिसने घोसाळकरांवर केलेला हा गोळीबार पैशाच्या व्यवहारातून केला असल्याचं समोर आलं आहे. वर्षभरापूर्वी त्यांच्यामध्ये वाद झाला होता. पण आता तो मिटल्याने ते एकत्र आले होते. मॉरिसने अभिषेक घोसाळकरांना गोळ्या घालत नंतर स्वतःवरही गोळी झा़डून घेतली.


 


राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न


राज्यात एकामागोमाग एक गोळीबाराच्या घटना घडत असल्याने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. दरम्यान राज्यातील पोलीस दल आता अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणाची दखल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून, घडलेल्या सर्व प्रकरणाची माहिती त्यांनी पोलिसांकडून घेतली आहे.  


 


हेही वाचा>>>


 Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकर हत्याकांडाचा 'ट्रिगर पॉईंट', मॉरिसने टोकाचं पाऊल का उचललं? हत्येमागची इनसाईड स्टोरी