सातारा : अभिनेते सयाजी शिंदे यांनी लावलेल्या शेकडो झाडांवर कुऱ्हाड चालवणारा विकृत सापडला आहे. पोलिसांनी आप्पा मदने या आरोपीला अटक केली आहे. तो पांढरवाडी इथलाच रहिवाशी आहे.

"सयाजी शिंदे यांनी लावलेली झाडं आपल्या हद्दीत असल्याचा दावा


आप्पा मदनेने केला आहे.


ही झाडं लावताना आपल्याला कोणतीही विचारणा केली नाही",


असं आप्पा मदनेने म्हटलं आहे.


माण तालुक्यातील पांढरवाडी इथं सयाजी शिंदे यांनी शेकडो झाडांची लागवड केली होती.  गेल्या सहा महिन्यापासून झाडांना पाणी घालून जगवलं. मात्र सोमवारी अचानक कुणी तरी या झाडांची कत्तल केली होती.

विशेष म्हणजे सयाजी शिंदे यांनी target="_blank">नवीन वर्षाचं स्वागत या झाडांना पाणी घालून केलं होतं. शिवाय परिसरातल्या शाळेतील विद्यार्थ्यांनीही झाडं वाचविण्यासाठी मेहनत घेतली होती. मात्र अचानक आता या झाडांवर कुऱ्हाड चालवल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात होती.

सातारा जिल्ह्यातील दुष्काळी पट्यातील पांढरवाडी गावात सयाजी शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड केली होती. सयाजी शिंदे यानी या गावात जवळपास 25 हजाराहून अधिक झाडे लावली होती.

पांढरवाडी गावाला जाणाऱ्या रोडच्या दुतर्फा जवळपास 100हून अधिक झाडांवर अज्ञाताने कुऱ्हाडीचे घाव घालून ती तोडल्याचे समोर आले होते.


संबंधित बातम्या

अभिनेते सयाजी शिंदेंनी लावलेली झाडं अज्ञातांनी तोडली!