Bacchu Kadu Vs Navneet Rana अमरावतीही निवडणूक शांततेत पार पडावी याची जबाबदारी आमची देखील आहे. मात्र, राणा दाम्पत्याचा असा प्लॅन होता की, हे प्रकरण अधिक चिघळावं आणि आमच्यावर लाठीचार्ज व्हावा, जेणेकरून त्यातून आम्ही संतापून असे काही कृत्य करू की आम्हाला अटक केली जाईल, तसेच आमचा कायमचा बंदोबस्त करता येईल. हा सुनियोजित कट राणा दाम्पत्याकडून करण्यात आल्याचा गंभीर आरोप प्रहारचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केला आहे. नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या म्हणण्यानुसारच येथील पोलीस यंत्रणा काम करते. त्यांचेच म्हणणे पोलीस ऐकत आहे. शिवाय एखाद्या कार्यकर्त्याप्रमाणे पोलीस यंत्रणा काम करत असल्याचा आरोपही बच्चू कडू यांनी पोलिसांवर केलाय.


देशाच्या गृहमंत्र्यांच्या सभेमध्येच कायदा पायदळी 


आता संपूर्ण महाराष्ट्राला या निमत्याने नवनीत राणांचा खरा चेहरा माहिती पडला आहे. त्यामुळे याचे उत्तर आता महाराष्ट्रातील जनता आपल्या मतदानातून दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास मला जनतेवर असल्याचेही बच्चू कडू म्हणाले. आमच्या आंदोलनाच्या भूमिकेमुळे कुठलाही वाईट परिणाम होऊ नये, याचा विचार देखील आम्ही करत आहोत. मात्र, देशाच्या गृहमंत्र्यांच्या सभेमध्ये जर कायदा पायदळी तुडविण्यात येत असेल, तर आमच्यासारख्याने न्याय कुणापुढे मागवा, हा मोठा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. काही वेळात या संबंधित सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून या संबंधित निर्णय घेऊ. ही एक प्रकारची तानाशाही असून याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभरात पडतील, असा इशाराही बच्चू कडू यांनी बोलताना दिला आहे.  


राणा दाम्पत्याचा सुनियोजित कट


प्रहारचा उमेदवार आणि बच्चू कडू यांना कशाप्रकारे अडचणीत आणता यईल आणि त्यांना कशी अटक करता येईल, याचा सुनियोजित कट राणा दाम्पत्याकडून करण्यात आल्याचा आरोपही बच्चू कडू यांनी बोलताना केला आहे. याप्रकरणी दाद मागण्यासाठी आम्ही न्यायालयीन लढाई देखील लढू. मात्र आपला पराभव दिसत असल्याने अशाप्रकारे दडपशाही करण्याचा अयशस्वी प्रयत्न आज या निमित्ताने झाला आहे. यांचे परिणाम आता भोगावे लागतील, किंबहुना मतदार याचा हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही बच्चू कडू यांनी बोलून दाखवला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या