Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मोठी घोषणा केली आहे. आता प्रत्येक गावात एका सेवकाची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिली आहे. ते हिंगोलीत (Hingoli) बोलत होते. नुसती गर्दी आणि मोठ्या सभेतून आपल्या समस्या सुटणार नाहीत. गावात येणारी अडचण सांगायला हक्काचं ठिकाण आपल्याला द्यावं लागणार आहे. त्यासाठी गावात एक मुलगा द्यावा लागेल असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
22 फेब्रुवारी ते 22 मार्च आपल्याला काही गोष्टी कराव्या लागणार आहेत. आपण एक आलो तर राहिलेले आरक्षण पण मिळेल असे मनोज जरांगे म्हणाले. नुसती गर्दी आणि मोठ्या सभेतून आपल्या समस्या सुटणार नाहीत. गावात येणारी अडचण सांगायला हक्काचं ठिकाण आपल्याला द्यावं लागणार आहे. त्यासाठी प्रत्येक गावात एक सेवक द्यावा लागणार आहे. त्याला संपूर्ण गाव अडचणी सांगेल असे जरांगे पाटील म्हणाले. त्यासाठी एक महिना आपण ते काम करत आहोत.
आरक्षण मिळालं असं ग्राह्य धरा ते मिळणार आहे
आरक्षण मिळालं असं ग्राह्य धरा ते मिळणार आहे असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. आपल्याला आपले मूळ व्यवसायकडे वळवायचे आहे, त्यासाठी आपण काम करतोय. लाखात कोटीत समाज एकत्र आला. मात्र आपण गरिबांसाठी काम करु शकलो नाही तर आपण एकत्र येऊन फायदा नाही असे मनोज जरांगे म्हणाले.
शेतकऱ्यांपासून ते गोर गरिबांच्या अडचणी सोडवण्यासाठी कोणीही नाही
शेतकऱ्यांपासून ते गोर गरिबांच्या अडचणी सोडवण्यासाठी कोणीही नाही. त्यामुळं गावातील लोकांच्या समस्या सोडवायला आपला एक माणूस असलाच पाहिजे असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. हा माणूस सेवक म्हणून काम करील. 22 फेब्रुवारी ते 22 मार्च ज्याला वेळ मिळेल त्याने अंतरवाली सराटीत यायचे असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. आपण सर्वजण असेच एक राहिलो तर राहिलेले आरक्षण देखील आपल्याला मिळेल असा विश्वास यावेली मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. नुसती गर्दी आणि मोठ्या सभेतून आपल्या समस्या सुटणार नाहीत. त्यामुळंआता प्रत्येक गावात आपल्याला आपला माणूस द्यावा लागणार आहे. हा मुलगा सेवक म्हणून सर्वांच्या अडचणी सोडवण्यासाठी काम करेल असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
मनोज जरांगेंचं महत्व कमी करण्यासाठी सुरेश धसांचा वापर, जितेंद्र आव्हाडांचा मोठा आरोप