मुंबई : राज्यातील 18 जिल्ह्यांमधील 3 हजार 666 ग्रामपंचायतींसाठी प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 81 टक्के मतदान झालं. यात थेट सरपंचपद आणि सदस्यपदांसाठीच्या मतदानाचा समावेश होता, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार आज सुमारे 4 हजार 119 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान होणार होतं. मात्र काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्याचबरोबर इतर विविध कारणांमुळे काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे आज 3 हजार 666 ग्रामपंचायतींसाठी मतदान झालं. किरकोळ अपवाद वगळता सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया शांतता आणि सुरळीतपणे पार पडली. सर्व ठिकाणी उद्या (मंगळवार) मतमोजणी होईल. मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या
  1. ठाणे- 33
  2. पालघर- 50
  3. रायगड- 162
  4. रत्नागिरी- 154
  5. सिंधुदुर्ग- 293
  6. पुणे- 168
  7. सोलापूर- 181
  8. सातारा- 256
  9. सांगाली- 425
  10. कोल्हापूर- 435
  11. उस्मानाबाद- 158
  12. अमरावती- 250
  13. नागपूर- 237
  14. वर्धा- 86
  15. चंद्रपूर- 52
  16. भंडारा- 361
  17. गोंदिया- 341
  18. गडचिरोली- 24
एकूण- 3,666