सांगलीत तहसील कार्यलयासमोरुन 4 ट्रक वाळूमाफियांनी पळवले!
एबीपी माझा वेब टीम | 31 Jan 2018 09:17 PM (IST)
वाळू माफियांनी काल मध्यरात्री हे ट्रक कार्यालयाचे गेट तोडून पळवून नेले, तर एक ट्रक मागे घेत असताना कार्यालयाच्या भिंतीला धडकल्याने हा प्रकार उघडकीस आला.
सांगली : विटा तहसील कार्यालयाच्या समोरुन वाळूमाफियांनी वाळू वाहतूक करणारे चार ट्रक पळवले. काल मध्यरात्री ही घटना घडली. जप्त केल्यानंतर हे ट्रक विटा तहसील कार्यालयाच्या समोर लावण्यात आले होते. वाळू माफियांनी काल मध्यरात्री हे ट्रक कार्यालयाचे गेट तोडून पळवून नेले, तर एक ट्रक मागे घेत असताना कार्यालयाच्या भिंतीला धडकल्याने हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात चार जणांना विटा पोलिसांनी अटक केली आहे. यात विटा तहसीलने 50 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणी तहसीलदार रंजना उंबरहंडे यांनी विटा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.