औरंगाबादमध्ये चार मुलांचा तलावात बुडून मृत्यू
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 28 Oct 2016 06:44 PM (IST)
औरंगाबाद : औरंगाबादच्या कन्नड तालुक्यात 4 मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. तलावावर पोहण्यासाठी गेलेल्या मुलांचा बुडून मृत्यू झाला. कन्नड तालुक्यातील आदर्श वसाहतीतील 4 शाळकरी मुलं सावरगावच्या शिवारात एका तलावात पोहण्यासाठी गेली होती. पाण्याचा अंदाज न आल्याने चौघंही पाण्यात बुडले. या मुलांची नावं रामेश्वर पवार(15), उमेश पवार(14), आकाश पवार(15) आणि कृष्णा राजपूत(17) अशी मृत विद्यार्थ्यांची नावं आहेत. तलावात बुडलेल्या या चारही मुलांचे मृतदेह सापडले आहेत.