शिवाय आता सीईटीबाबत हिताचा निर्णय न झाल्यास शनिवारवाड्यात साखळी उपोषण करु,असा इशाराही त्यांनी दिला आहे.
राज्यातल्या इतरही भागातल्या विद्यार्थी आणि पालकांनी या उपोषणात सहभागी व्हावं असं आवाहन पुण्यातल्या पालकांनी केलं आहे.
नीट परीक्षेविरोधातील याचिकावर उद्या सुनावणी
दरम्यान, नीट परीक्षेविरोधातली सुनावणी उद्या होणार आहे. आज सर्वोच्च न्यायालयानं यासंदर्भातल्या याचिका दाखल करुन घेतल्या. महाराष्ट्रासह एकूण ८ राज्यांनी या नीट परीक्षेला आणि त्याच्या तात्काळ अंमलबजावणीला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे कोर्टात नीट परीक्षेचा निकाल काय लागणार, याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांमधली धाकधूक मात्र कायम आहे.
याआधीही सुप्रीम कोर्टानं केंद्रासह पालक आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या स्वतंत्र पुनर्विचार याचिका फेटाळून लावल्या आहेत.
मेडिकल प्रवेशासाठी संपूर्ण देशात एकच परीक्षा असावी, असा निर्णय कोर्टानं दिला आहे. मात्र, ती परीक्षा यंदापासून लागू करावी, असंही कोर्टानं म्हटल्यानं ऐनवेळेस विद्यार्थ्यांची अभ्यासासाठी मोठी धावपळ होणार आहे.