2nd June Headlines: आज दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. या निमित्ताने किल्ले रायगड आणि राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर, महाराष्ट्र बोर्डाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. 


शिवराज्याभिषेक दिन


- आज तिथीनुसार 350 वा शिवराज्यभिषेक सोहळा...श्री शिवराज्याभिषेकदिनोत्सव सेवा समिती दुर्गराज, रायगड समितीकडून तिथीनुसार कार्यक्रमाचे आयोजन. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार. मनसे अध्यक्ष राज ठाकरेदेखील हजेरी लावणार. 


दहावीचा निकाल


- दहावीचा निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. दहावीच्या परीक्षेसाठी राज्यातील 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 84 हजार 416 मुले होती तर 73 हजार 62 मुली होत्या. दहावीचा निकाल  'एबीपी माझा'च्या वेबसाईटवर पाहता येणार.


 आषाढी वारीसाठी दोन पालख्या प्रस्तान ठेवणार


त्र्यंबकेश्वर (नाशिक) – संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आज दुपारी 2 वाजता पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. यंदा जवळपास 45 पालख्या आणि हजारो वारकरी पायी दिंडीत सहभागी होणार आहेत. जिल्ह्यात वारकऱ्यांसाठी 12 फिरते शौचालय आणि पिण्याच्या पाण्याचे पाच टँकर प्रशासनाकडून पहिल्यांदाच उपलब्ध करून दिले जाणार आहेत. वारकऱ्यांच्या सोयीसाठी यंदा इतिहासात पहिल्यांदाच एक दिवस आधी पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहे. दरवर्षी चतुर्दशीच्या दिवशी होणारे प्रस्थान यंदा त्रयोदशीला होणार आहे. निवृत्तीनाथ महाराजांचे गुरू गहीनीनाथ महाराजांच्या समाधीस्थळी पहिला मुक्काम असणार आहे. 2 जून ते 28 जून या कालावधीत वारी निघते आहे.


जळगाव – संत मुक्ताबाई पालखीचे आज दुपारी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. यावेळी शेकडो दिंड्या आणि हजारो वारकरी यामध्ये सहभागी होणार आहेत.
 
मुंबई 


- डॉ. तात्याराव लहाने आज जेजे रुग्णालय प्रकरणी पत्रकार परिषद घेणार आहेत.


-आजपासून दोन दिवस काँग्रेस लोकसभा निवडणुकीची चाचणी करणार आहे. जिल्हा निहाय बैठका घेतल्या जाणार आहे. यासाठी राज्यातील काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित असणार आहेत. 
मविआ पक्षाचा फोकस लोकसभा - महापालिका होणार नाहीत असं या पक्षांना वाटतय का?


-  बेस्ट बेकरी प्रकरणाचा कोर्ट आज निकाल देण्याची शक्यता आहे.
- विशेष पीएमएलए कोर्टात आज दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी सुनावणी होणार आहे. सदानंद कदम आणि जयराम देशपांडे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी. 


सांगली 


- डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी सांगली जिल्ह्यात महारक्तदान यात्रेचा संकल्प केला आहे. या यात्रेच्या माध्यमातून सहा महिन्याच्या कालावधीत जवळपास एक लाख लोकांचे रक्तदान करण्यात येणार आहे. या महारक्तदान यात्रेचा शुभारंभ आज पलूस शहरातून होणार असून सहा महिन्याच्या कालावधीत प्रत्येक तालुक्यात ही रक्तदान यात्रा पार पडणार आहे.
 
 
धुळे


- शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आज भाजपच्या वतीने 65 फूट उंच ध्वज स्तंभाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचे उपस्थितीत लोकार्पण होणार आहे. 


हिंगोली


-  जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे 350 वा शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रायगडाहून आणलेल्या मातीची मंगल कलश यात्रा काढली जाणार आहे. त्यानंतर एक छोटी सभा होईल या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह मराठवाड्यातील काही आमदार उपस्थित राहण्याची शक्यता आहे.