25 IAS Officers Transfer Of Maharashtra: महाराष्ट्रातील 25 आयएएस अधिकाऱ्यांची काल (2 एप्रिल) एकाच दिवशी बदली (25 IAS Officers Transfer) करण्यात आली. राज्यातील अनेक जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त आयुक्त यांची काल बदली झाली. या सगळ्या अधिकाऱ्यांना लवकरच जनगणनेच्या प्रशिक्षणासाठी पाठवले जाणार आहे. जनगणनेचे काम साधाराण दीड-दोन वर्षे चालणार आहे. जनगणनेची जबाबदारी अधिकाऱ्यांवर दिली जावी, असे जनगणना आयुक्त कार्यालयाचे आदेश होते. केंद्रीय कार्मिक कार्यालयानेही या आदेशाचे पालन करण्यास राज्य सरकारला सांगितले होते. त्यानूसार काल राज्यातील तब्बल 25 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. (25 IAS Officers Transfer In Maharashtra)

Continues below advertisement

कोणत्या अधिकाऱ्याची कुठे झाली बदली? (Transfer of 25 IAS Officers in Maharashtra)

  1. सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आता नागपूर जिल्हाधिकारी
  2. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन आता सोलापूरचे जिल्हाधिकारी
  3. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा हे आता छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी
  4. श्रीमती वसुमना पंत चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी पदी असणार
  5. पशुसंवर्धन आयुक्त पुणे प्रवीण कुमार देवरे आता बुलढाणा जिल्हाधिकारी पदी बदली तर बुलढाण्याचे जिल्हाधिकारी किरण पाटील यांची आता पशुसंवर्धन आयुक्त पुणे पदी बदली 
  6. दीपक सिंगला यांची महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आयुक्त, नागपूर पदी बदली 
  7. श्रीमती के मंजूलक्ष्मी यांची अतिरिक्त आयुक्त,पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पदी बदली 
  8. भारत बास्टेवाड यांची लातूरच्या जिल्हाधिकारी पदी बदली
  9. डॉ विजय राठोड यांची कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी पदी बदली
  10. डॉ मंगेश गोंदवले यांची गोंदिया जिल्हाधिकारी पदी बदली
  11. प्राजीत नायर यांची अतिरिक्त महापालिका आयुक्त पुणे पदी बदली 
  12. वर्षा ठाकूर घुगे यांची सहमुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुंबई पदी बदली 
  13. जी श्रीकांत यांची मिशन संचालक,जल जीवन मिशन नवी मुंबई या पदावर बदली 
  14. अमोल येडगे यांची महापालिका आयुक्त छत्रपती संभाजी नगर पदी बदली
  15. अंकित यांची अतिरिक्त महापालिका आयुक्त नागपूर पदावर बदली 
  16. दिलीप स्वामी यांची व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अकोला या पदावर बदली 
  17. श्रीमती अंजली शर्मा यांची महापालिका आयुक्त जालना महानगरपालिका या पदावर बदली 
  18. श्रीमती मिन्नू पी एम यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद छत्रपती, संभाजी नगर पदी बदली 
  19. श्रीकृष्ण कांत कनवारिया यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना या पदावर बदली 
  20. श्रीमती वर्षा लड्डा यांची महापालिका आयुक्त अमरावती महानगरपालिका पदी बदली 
  21. डॉ. राजेंद्र भारूड यांची महापालिका आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका पदी बदली 
  22. सत्यम गांधी यांची मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती या ठिकाणी बदली 
  23. श्रीमती संगीता मोहपात्रा यांची महापालिका आयुक्त सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका पदी बदली 
  24. डॉ. जास्मिन यांची मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, कोल्हापूर या ठिकाणी बदली

महाराष्ट्रातील 25 आयएएस अधिकाऱ्यांची बदली, पाहा संपूर्ण यादी- (25 IAS Officers Transferred in Maharashtra List)

अ.क्र.अधिकाऱ्याचे नावविद्यमान/जुने पदनवीन नियुक्ती
1जी. श्रीकांतआयुक्त, छत्रपती संभाजीनगर मनपाCEO, जल जीवन मिशन,नवी मुंबई
2दिलीप स्वामीजिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगरMD,महाराष्ट्रराज्य बियाणे महामंडळ,अकोला
3वर्षा ठाकूर-घुगेजिल्हाधिकारी, लातूरसह-मुख्य कार्यकारी अधिकारी, MIDC, मुंबई
4दीपक सिंगलाअप्पर आयुक्त, PMRDA, पुणेआयुक्त, मनरेगा (MGNREGS), नागपूर
5के. मंजुलक्ष्मीआयुक्त, कोल्हापूर मनपाअप्पर आयुक्त, PMRDA, पुणे
6डॉ. राजेंद्र भारुडप्रकल्प संचालक, RUSA, मुंबईआयुक्त, कोल्हापूर मनपा
7डॉ. प्रवीणकुमार देवरेआयुक्त, पशुसंवर्धन, पुणेजिल्हाधिकारी, बुलढाणा
8डॉ. भारत बस्तेवाडआयुक्त, मनरेगा, नागपूरजिल्हाधिकारी,लातूर
9वर्षा लड्डाकृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणेआयुक्त, अमरावती मनपा
10अमोल येडगेजिल्हाधिकारी, कोल्हापूरआयुक्त, छत्रपती संभाजीनगर मनपा
11डॉ. विजय राठोडसह-मुख्य कार्यकारी अधिकारी, MIDCजिल्हाधिकारी, कोल्हापूर
12विनय गौडा जी.सी.जिल्हाधिकारी, चंद्रपूरजिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर
13डॉ. किरण पाटीलजिल्हाधिकारी,बुलढाणाआयुक्त, पशुसंवर्धन, पुणे
14डॉ. मंगेश गोंदवलेMD, MAIDC,मुंबईजिल्हाधिकारी, गोंदिया
15कुमार आशीर्वादजिल्हाधिकारी, सोलापूरजिल्हाधिकारी, नागपूर
16वासुमाना पंतअप्पर आयुक्त, नागपूर मनपाजिल्हाधिकारी,चंद्रपूर
17प्रजित नायरजिल्हाधिकारी,गोंदियाअप्पर आयुक्त,पुणेमनपा
18अंकितCEO, जि.प. छत्रपती संभाजीनगरअप्पर आयुक्त,नागपूरमनपा
19कार्तिकेयन एस.CEO, जि.प. कोल्हापूरजिल्हाधिकारी, सोलापूर
20संजिता मोहपात्राCEO, जि.प. अमरावतीआयुक्त, सांगली-मिरज-कुपवाड मनपा
21मिन्नू पी.एम.CEO, जि.प. जालनाCEO, जि.प.छत्रपती संभाजीनगर
22सत्यम गांधीआयुक्त,सांगलीमनपाCEO, जि.प.अमरावती
23जास्मिनसहाय्यक जिल्हाधिकारी, राजापूर विभागCEO, जि.प. कोल्हापूर
24अंजली शर्मासहाय्यक जिल्हाधिकारी, नंदुरबारआयुक्त, जालना मनपा
25कृष्णकांत कन्वरियासहाय्यक जिल्हाधिकारी, शहादाCEO, जि.प. जालना

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Census 2027 : तब्बल 15 वर्षांनंतर देशभरात आजपासून जनगणनेचा प्रारंभ, दोन टप्प्यात जनगणना, द्यावी लागतील 'या' 33 प्रश्नांची उत्तरे, वाचा A to Z माहिती

Continues below advertisement