20th June Headlines: आज दिवसभरात आज सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात घडामोडी घडणार आहेत. त्यातील काही महत्त्वाच्या घटना आहेत. यामध्ये संत ज्ञानेश्वर यांच्या पालखीचे पहिलं उभे रिंगण चांदोबाचा लिंब येथे पार पडणार आहे. संत तुकाराम यांची पालखी आज सणसर येथून आंथुर्णे मुक्कामी जाणार आहे. राजकीय क्षेत्रातही मोठ्या घडामोडी घडणार आहेत. आज शिवसेना ठाकरे गटाकडून शिंदे गटाकडून 'जागतिक खोके दिवस' साजरा करण्यात येणार आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून गद्दार दिन साजरा करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार आहे.
>> पालखी सोहळा
- ज्ञानोबांची पालखी आज लोणंदहून तरडगाव मुक्कामी जाणार आहे. संत ज्ञानेश्वर यांच्या पालखीचे पहिलं उभे रिंगण चांदोबाचा लिंब येथे होणार आहे.
- संत तुकाराम यांची पालखी आज सणसर येथून आंथुर्णे मुक्कामी जाणार आहे. तुकोबांच्या पालखी सोहळ्यात दुसरं रिंगण गोल रिंगण आज बेलवंडी येथे होणार आहे.
शिवसेना ठाकरे गट 'खोके दिन' म्हणून साजरा करणार, राष्ट्रवादीकडून गद्दार दिन; शिंदे गटाकडून स्वाभिमान दिनाची हाक
आदित्य ठाकरेंनी आजचा दिवस जागतिक खोके दिवस साजरा करावा असे आवाहन केले आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून मुंबईसह राज्यातील विविध ठिकाणी कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. पोलीसही अलर्ट मोडवर आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गद्दार दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्येक तालुका स्तरावर गद्दार दिन साजरा करण्याचे आदेश दिले आहेत.
शिंदे गट स्वाभिमान दिन म्हणून साजरा करणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून खोके दिवस तर राष्ट्रवादीकडून गद्दार दिन म्हणून साजरा केला जात असताना शिंदे गटाकडून स्वाभिमान दिन साजरा करणार असल्याचं म्हंटलं आहे.
जगन्नाथ पुरीची यात्रा
पुरी – आजपासून जगन्नाथ पुरीची यात्रा सुरू होणार आहे. या यात्रेत साधारण 25 लाख भाविक सहभागी होण्याची शक्यता वर्तवली आहे.
अहमदाबाद – अहमदाबाद मध्ये आज भगवान जगन्नाथ यांची 146 वी रथ यात्र निघणार आहे.
मुंबई
- ठाकरे गटातील मुंबईतील माजी नगरसेवकांची शिवसेना भवन येथे बैठक पार पडणार आहे. उद्धव ठाकरे माजी नगरसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत.
- राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात सर्व आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे.
- राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी त्यांच्याविरोधात ईडीनं दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याकरता हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी.
जळगाव
- मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात एकनाथ खडसे यांनी केलेल्या अब्रूनुकसान दाव्याची आज जळगाव न्यायालयात सुनावणी होणार आहे. 2016 साली गुलाबराव पाटलांनी खडसेंवर भ्रष्टाचारांचे आरोप केले होते. त्या विरोधात खडसेंनी गुलाबराव पाटलांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला होता.
सोलापूर
- विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे आज जिल्हा दौऱ्यावर आहेत.
- पंढरपूरमध्ये विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे करणार आषाढी यात्रा व्यवस्था व्यवस्थापन पाहणी.
नाशिक
- जगन्नाथ पुरीच्या धर्तीव आज नाशिकमध्ये जगन्नाथ रथयात्रा काढली जाणार आहे. पहिल्यादाच रथयात्रा निघत असून पंचवटी मधील पंचमुखी हनुमान मंदिरापासून यात्रेला सुरूवात होणार आहे.
हिंगोली
- अक्षय भालेराव हत्याप्रकरणी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे.
जालना
- भाजपच्या वतीने जालन्यात व्यापारी संमेलन घेण्यात येणार आहे. या संमेलनाला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, कर्नाटकचे माजी मंत्री अरविंद लिंबावली उपस्थित रहाणार आहेत.