एक्स्प्लोर

17 February In History : क्रांतिकारी लहुजी वस्ताद आणि वासुदेव बळवंत फडकेंची पुण्यतिथी, इतिहासात आज

On This Day In History: फेब्रुवारी महिन्यातील 17 तारीख ही अनेक महत्त्वाच्या घटनांची साक्षीदार आहे. आजच्याच दिवशी क्रांतिकारी लहुजी वस्ताद यांची पुण्यतिथी आहे.

मुंबई: फेब्रुवारी महिन्यातील 17 तारीख ही अनेक महत्त्वाच्या घटनांची साक्षीदार आहे. आजच्याच दिवशी क्रांतिकारी लहुजी वस्ताद यांची पुण्यतिथी आहे. तर 17 फेब्रुवारी हा लढाऊ राष्ट्रवादाचे जनक म्हणून आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या देखील पुण्यतिथीचा दिवस आहे. याशिवाय आजच्या दिवशी अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. 

1600 - जिओर्डानो ब्रुनो यांचं निधन -
 
जिओर्डानो ब्रुनो यांचं आजच्याच दिवशी निधन झालं होतं. सूर्याभोवती पृथ्वी फिरते. सूर्यासारखे अनेक तारे आहेत. त्यांच्याभोवती पृथ्वीसारखे अनेक ग्रह आहेत आणि त्यांच्यावर सजीवसृष्टी असू शकते, असे मत त्यांनी मांडले होते. आजच्याच दिवशी 1600 मध्ये जिओर्डानो ब्रुनो यांना बायबलविरोधी मत मांडल्याबद्दल क्रूसावर बांधून जाळण्यात आले होते. 

1782 - बुधु भगत यांचा जन्म 

स्वातंत्र्य सैनिक बुधु भगत यांचा जन्म झाला होता. 17 फेब्रुवारी रोजी झारखंड राज्यातील रांची जिल्ह्यातल्या सिलगाई येथे बुधु भगत यांचा जन्म झाला होता. इंग्रजांनी आदिवासी जनतेचे जमिनीचे हक्क काढून जमीनदारांना देण्याचे षडयंत्र रचले होते. या अन्यायाविरोधात बुधू भगत यांनी इंग्रजांविरोधात सशस्त्र संग्राम उभारला.

1801 : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत सारखीच मते 

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत थॉमस जेफरसन आणि एरन बर यांना सारखीच मते मिळाली. हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह्सनी जेफरसन यांना राष्ट्राध्यक्ष केलं.  तर बर यांना उपाध्यक्ष केले

1874 थॉमस वॉटसन ( Thomas John Watson) 

अमेरिकेतील उद्योगपती थॉमस वॉटसन यांचा आजच्याच दिवशी जन्म झाला होता. थॉमस यांनी उमेरिकेतील उद्योगाला नवी दिशा दिली. थॉमस वॉटसन यांनी आय. बी. एम. (IBM) या कंपनीची स्थापना केली होती. त्यांचा मृत्यू 19 जून 1956 रोजी झाला होता. 

1881 क्रांतिकारी लहुजी वस्ताद यांची पुण्यतिथी -

क्रांतिकारक लहुजी वस्ताद यांचं आजच्याच दिवशी 1881 मध्ये निधन झालं होतं. लहुजी साळवे यांचे पूर्णनाव लहु राघोजी साळवे असे होते .त्यांचा जन्म पुरंदर किल्याच्या पायथ्याशी असलेल्या ‘पेठ’ या गावातील एका मातंग कुटुंबात झाला.  मातंग समाजात जन्माला आलेल्या लहूजींना युद्धकलेचे प्रशिक्षण त्यांच्या घरातील वीर पुरुषांकडून मिळाले होते. लहूजींच्या वडिलांचे नाव राघोजी साळवे व आईचे नाव विठाबाई होते. लहुजी दांडपट्टा, घोडेस्वारी, भालाफेक, मंडूक, तोफागोळा चालवयात पारंगत हाते. त्यांना आरक्रांतीचौर, क्रांतीगुरू, लहुजीबुवा,मांग या नावानेही ओळखले जातात.

1883 - वासुदेव बळवंत फडकेंची पुण्यतिथी  (vasudev balwant phadke )-

17 फेब्रुवारी हा लढाऊ राष्ट्रवादाचे जनक म्हणून आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथीचा दिवस. काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना आजच्याच दिवशी 1883 मध्ये क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे निधन झाले होते. राजकीय भूमिका घेत त्यांनी इंग्रजांविरुधात सशस्त्र उठाव केला होता. एडन येथे ते काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते. वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म पनवेल जवळील शिरढोण येथे झाला होता.  त्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आद्यक्रांतिकारक किंवा सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जाते.

1954 : के.चंद्रशेखर राव जन्मदिन (K. Chandrashekar Rao)

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा आजच्या दिवशी जन्म झाला होता. त्यांनी नुकतेच  राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्षाचे नाव भारत राष्ट्र समिती असे आहे. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी फेडरल फ्रंट नावाचा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला होता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sujay Vikhe : बाळासाहेब थोरातांच्या होम ग्राउंडवर सुजय विखेंचा 'मै हूँ डॉन' गाण्यावर डान्स; पाहा PHOTOS
बाळासाहेब थोरातांच्या होम ग्राउंडवर सुजय विखेंचा 'मै हूँ डॉन' गाण्यावर डान्स; पाहा PHOTOS
Suresh Dhas : धनंजय मुंडेंविरोधात माझ्याकडे 'दप्तर', उद्या-परवा काढू, सुरेश धस नेमका कोणता नवा बॉम्ब फोडणार?
धनंजय मुंडेंविरोधात माझ्याकडे 'दप्तर', उद्या-परवा काढू, सुरेश धस नेमका कोणता नवा बॉम्ब फोडणार?
Parbhani: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई, 3 पोलीस कर्मचारी निलंबित, आंदोलकांच्या 15 मागण्या काय?
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई, 3 पोलीस कर्मचारी निलंबित, आंदोलकांच्या 15 मागण्या काय?
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी एका दगडात दोन पक्षी मारले, भाजपच्या गळाला लागलेल्या राजन साळवींना खेचून आणलं
एकनाथ शिंदेंनी एका दगडात दोन पक्षी मारले, रत्नागिरीत भाजपचा प्लॅन फिस्कटला, ठाकरेंनाही दिला शह
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalna : जालन्यात वाळू माफिया आणि इतर गुन्हेगारांविरोधात प्रशासन अॅक्शन मोडवर ABP MajhaManoj Jarange Vs Devendra Fadnavis : आता रस्त्याची लढाई, 15 फेब्रुवारीपासून साखळी उपोषणABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलान्स : 7 AM : 09 Feb 2025 : ABP MajhaSpecial Report on Congress Delhi Election:दिल्लीतील पराभवामुळेRahul Gandhiयांच्या नेतृत्वावर प्रश्न?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sujay Vikhe : बाळासाहेब थोरातांच्या होम ग्राउंडवर सुजय विखेंचा 'मै हूँ डॉन' गाण्यावर डान्स; पाहा PHOTOS
बाळासाहेब थोरातांच्या होम ग्राउंडवर सुजय विखेंचा 'मै हूँ डॉन' गाण्यावर डान्स; पाहा PHOTOS
Suresh Dhas : धनंजय मुंडेंविरोधात माझ्याकडे 'दप्तर', उद्या-परवा काढू, सुरेश धस नेमका कोणता नवा बॉम्ब फोडणार?
धनंजय मुंडेंविरोधात माझ्याकडे 'दप्तर', उद्या-परवा काढू, सुरेश धस नेमका कोणता नवा बॉम्ब फोडणार?
Parbhani: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई, 3 पोलीस कर्मचारी निलंबित, आंदोलकांच्या 15 मागण्या काय?
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई, 3 पोलीस कर्मचारी निलंबित, आंदोलकांच्या 15 मागण्या काय?
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी एका दगडात दोन पक्षी मारले, भाजपच्या गळाला लागलेल्या राजन साळवींना खेचून आणलं
एकनाथ शिंदेंनी एका दगडात दोन पक्षी मारले, रत्नागिरीत भाजपचा प्लॅन फिस्कटला, ठाकरेंनाही दिला शह
Ahilyanagar Crime : प्राचार्याकडून 9 वर्षाच्या विद्यार्थ्यासोबत नको ते कृत्य, आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत घरी बोलावलं अन्...; अहिल्यानगरमधील धक्कादायक घटना
प्राचार्याकडून 9 वर्षाच्या विद्यार्थ्यासोबत नको ते कृत्य, आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत घरी बोलावलं अन्...; अहिल्यानगरमधील धक्कादायक घटना
Nagpur Crime: नागपूरच्या हुडकेश्वरमधील विवाहित महिलेच्या हत्याप्रकरणी धक्कादायक माहिती, प्रियकराचा मृतदेहावर बलात्कार
प्रियकराने विवाहित महिलेला गळा दाबून संपवलं, मृतदेहाशी शारीरिक संबंध; नागपूरमधील धक्कादायक घटना
Manoj Jarange Patil: मेहुण्याला तडीपारीची नोटीस मिळताच मनोज जरांगेंची देवेंद्र फडणवीसांवर आगपाखड, म्हणाले...
तू रडकुंडीला आला होता, तुला ही गादी कधीच मिळू शकत नव्हती, मनोज जरांगेंची देवेंद्र फडणवीसांवर आगपाखड
दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
Embed widget