धुळे : गेल्या चोवीस तासात धुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये 12 जणांचा मृत्यू झाला आहे.
सुरत-नागपूर महामार्गावर साक्रीजवळ ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला ओम्नी आदळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला.
भाडणे फाट्याजवळ दुचाकींचा समोरासमोर अपघात होऊन एकाचा मृत्यू झाला.
मुंबई -आग्रा महामार्गावरील कळमाडीजवळ उभ्या असलेल्या ट्रकवर पाठीमागून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला. अन्य एका अपघातात साक्री-पिंपळनेर मार्गावरील धाडणे फाट्याजवळ झालेल्या तिहेरी अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला.
सायंकाळच्या वेळेला धुळे शहराजवळ मुंबई-आग्रा महामार्गावरील गुरुद्वाराजवळ झालेल्या अपघातात मालेगावकडून धुळ्याकडे येणारी सुमो डंपरवर आदळून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर यामध्ये दहाहून अधिक प्रवास जखणी झाले आहेत.