Pune : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केल्यानुसार, येत्या 10 फेब्रुवारीपासून बारावीची लेखी परीक्षा सुरु होणार आहे. ही परीक्षा 18 मार्चपर्यंत चालणार आहे. दरम्यान, या परीक्षेसंदर्भात महत्वाची माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्यांना उद्यापासून बारावीचे हॉल तिकीट मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च 2026 मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे हॉल तिकीट उद्यापासून उपलब्ध होणार आहे. इयत्ता बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची हॉल तिकिट ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहे. संबंधित शाळा व ज्युनिअर कॉलेज यांनी हॉल तिकिटांचे प्रिंट आऊट काढून विद्यार्थ्यांना वितरित करावी, अशा सूचना राज्य मंडळाकडून करण्यात आल्या आहेत.
प्रवेशपत्राच्या प्रतीवर मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांची सही असणे आवश्यक
बारावीच्या परीक्षेसाठी बसणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध करुन दिले जाणार आहे. यानंतर मंडळाच्या उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी या हॉल तिकीटची प्रत काढून विद्यार्थ्यांना द्यायची आहे. यासाठी कोणतेही वेगळे शुल्क लागणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे. प्रवेशपत्राच्या प्रतीवर मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांची सही असणे आवश्यक आहे, अशा सूचना राज्य मंडळाने दिल्या आहेत. हॉल तिकीटवर फोटो असल्यावर त्यावर मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे. यानंतरच हॉल तिकीट ग्राह्य धरले जाईल. बारावीची परीक्षा ही 10 फेब्रुवारी ते 18 मार्च रोजी होणार आहे. या कालावधीत परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांकडे हॉल तिकीट असणे अनिवार्य आहे.
10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 दरम्यान परीक्षा होणार
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात बारावी परीक्षा (सर्वसाधारण, द्विलक्षी व व्यवसाय अभ्यासक्रम, तसेच माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांची ऑनलाइन परीक्षा) दिनांक 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 दरम्यान होणार आहे. तत्पूर्वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच एनएससीक्यूएफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा (माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसह) दि.23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान पार पडणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आगामी फेब्रुवारी-मार्च 2026 मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12 वी च्या परीक्षा घेण्यात येणार आहेत.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI