मुंबई : हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. हार्बर मार्गावर आज पहिल्यांदाच 12 डब्यांची लोकल धावली. वाशी रेल्वे स्थानकावरुन सकाळी 6 वाजता 12 डब्यांची पहिली लोकल सुटली.


 

हार्बर मार्गावर आज दिवसभरात 12 डब्याच्या लोकलच्या 14 फेऱ्या होणार आहेत.



हार्बर मार्गावरच्या वाढत्या गर्दीमुळे अनेक वर्षांपासून 12 डब्यांच्या लोकलची मागणी होत होती. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने हार्बर रेल्वे मार्गावर 72 तासांचा मेगाब्लॉकही घेतला होता. डीसी टू एस विद्युतप्रवाह परिवर्तन झाल्यानंतर मध्य रेल्वेने 12 डब्यांची लोकल चालवण्याला प्राधान्य दिलं होतं.

 

इतकंच नाही तर 12 डब्यांच्या लोकलसाठी प्लॅटफॉर्मची लांबी देखील वाढवण्यात आली आहे. 12 डब्यांच्या लोकलमुळे प्रवासी क्षमता 33 टक्क्यांनी वाढणार असून त्यामुळे गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.

 

संबंधित बातम्या

हार्बर मार्गावर उद्यापासून 12 डब्यांची लोकल धावणार?


हार्बर मार्गावर 29 एप्रिलपासून 12 डब्यांची लोकल