मुंबई : कोकण रेल्वेत तब्बल 113 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. यासंबंधीची जाहिरातही नुकतीच कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे. स्टेशन मास्तर, वरिष्ठ लिपिक, गुड्स गार्ड, अकाउंट असिस्टंट या पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. 113 पदांसाठी ही नवी भरती असून योग्य उमेदवारांना अधिकृत वेबसाईटवरुन अर्ज करता येणार आहे.
उमेदवारांना कोकण रेल्वेत नोकरी मिळवण्यासाठी konkanrailway.com या त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरुन 12 मे पर्यंत अर्ज करता येणार आहे.
अर्ज शुल्क :
जनरल उमेदवार : 500 रुपये
SC/ST : 250 रुपये
वयोमर्यादा :
जनरल : 18 ते 33 वर्षांपर्यंत
SC/ST : 5 वर्ष अतिरिक्त सूट
OBC : 3 वर्ष अतिरिक्त सूट
एकूण जागा : 113
स्टेशन मास्तर : 55
गुड्स गार्ड : 37
अकाउंट असिस्टंट : 11
वरिष्ठ लिपिक : 10
शैक्षणिक अर्हता :
स्टेशन मास्तर : पदवीधर
गुड्स गार्ड : पदवीधर
वरिष्ठ लिपिक : पदवीधर
अकाउंट असिस्टंट : B.Com