Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना दमदार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. गेल्या चार दिवसापासून अनेक ठिकाणी अतिवृष्टी (Rain Weather Alert) पाहायला मिळत आहे. ज्याप्रकारे अनेक भागात मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे पुरात वाहून, घर कोसळून,वीज पडून, त्यासोबतच भिंत पडून आतापर्यंत 21 जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याचे समोर आलं आहे. तर दहा जण यामध्ये जखमी झाले आहेत.  15 ते 19 या चार दिवसांच्या कालावधीत  21 जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून यामध्ये सर्वाधिक 8 जणांचा मृत्यू हा एकट्या नांदेड (Nanded)जिल्ह्यात झाला आहे. 

नांदेड मधील पावसाने मृतांची संख्या 8 वर,शोधकार्य सुरूच

नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील 18 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या अतिवृष्टीत हसनाळ या गावात पुराचे पाणी शिरल्यामुळे आता पर्यंत 5 जणांचा मृत्यू झालेला आहे. तर मुखेड - उदगीर रस्त्यावरील धडकनाळ येथील पुलावरून एक कार आणि एक ऑटोमधील सात जण पुराच्या पाण्यात वाहून गेले होते. यातील 3 जणांना वाचविण्यात उदगीर अग्निशमन दलाला यश आले असून उर्वरित 4 बेपत्ता जणांपैकी 3 जणांचा मृतदेह सापडले आहेत. चार बेपत्ता व्यक्तींपैकी तीन व्यक्ती मयत झाले असून तिघांचे मृतदेह सापडले आहेत. 

पाच दिवसांमध्ये झालेल्या पावसाने 2745 हेक्टर वरील खरीप पिकांना फटका 

मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने बीड जिल्ह्यात उसंत घेतलीय. मात्र पाच दिवसात झालेल्या पावसानं 2745 हेक्टरवरील खरीप पिकांना फटका बसला आहे. तर दोन जणांसह चार जनावरांचा पुरात मृत्यू झालाय. बीड जिल्ह्यात 14 ऑगस्ट पासून दमदार पावसाला सुरुवात झाली होती. त्यानंतर आज सकाळी पावसाने उसंत घेतलीय. यादरम्यान 2745 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल प्रशासनाचा आहे. 89 गावातील 4907 शेतकऱ्यांचं हे नुकसान झाले आहे. परळी मध्ये पुरात दोघेजण वाहून गेले. तर चार जनावरांचाही मृत्यू झाला. दोन कच्ची घरे, चार पक्की घरे आणि तीन झोपड्यांची पडझड झाली.

तालुका निहाय झालेले नुकसान

- बीड - 250- गेवराई - 700- माजलगाव - 200- केज - 1015- परळी - 560- अंबाजोगाई - 20

एकूण 2745 हेक्टरवर हे नुकसान झाले आहे. दरम्यान पाच दिवसांमध्ये झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.

आणखी वाचा