Marathwada Rain Update : राज्यातील बहुतांश जिल्ह्याला मुसळधार पावसाने (Heavy Rain) अक्षरशः झोडपून काढले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रसह उर्वरित विभागात पावसाच्या सरी कोसळत आहे. अशातच मराठवाड्यात (Marathwada) सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टीचा जोर कायम असल्याचे चित्र आहे. परिणामी, अनेक गावांसह शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शनिवारी 33 मंडळांत अतिवृष्टी झाल्यानंतर रविवारीही रात्रीतून झालेल्या पावसामुळे 32 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. अद्याप पावसाचा जोर कायम असला तरी आता पर्यंतच्या पावसाने बळीराजाचे मोठं नुकसान केलं असून या अतिवृष्टीची दाहकता समोर आली आहे.

Continues below advertisement

अतिवृष्टीची दाहकता समोर, शेतीसह जनावरांचे मोठं नुकसान

मिळालेल्या माहितीनुसार, मराठवाड्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे तीन लाख हेक्टरचे नुकसान झाले. तर 15 लाख 543 हेक्टरपर्यंत पिकांच्या नुकसानीचा आकडा गेला आहे. 1,48, 961 हेक्टर जिरायत, 3,861 हेक्टर बागायत तर 7,071 हेक्टर फळपिकांच यात नुकसान झालं. तर चार जनांचा पावसाने बळी घेतला असून यात शोकडो मुक्या प्राण्याचा जीव गेलाय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण, सिल्लोडनंतर आता कन्नड तालुक्यातील कंरजखेडा महसूल मंडळांमध्ये काल (15 सप्टेंबर) रात्रीपासुन जोरदार पाऊस चालू आहे. अद्याप अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शिवाय यात शेतीचेही नुकसान झाले आहे. तर तिकडे पुर्णा नदी दुथडी भरून वाहत आहेत.

हिंगोली जिल्ह्यात सलग चार दिवस मुसळधार, शेतीच अतोनात नुकसान

हिंगोली जिल्ह्यात सलग चार दिवस जोरदार झालेल्या पावसानंतर हिंगोलीच्या वातावरणात धुक्याची दाट चादर पाहायला मिळाली आहे. पावसाळ्यामध्ये सर्वाधिक काळ मागील चार दिवस पाऊस झाला आहे. यात शेतीच अतोनात नुकसान झाले असून त्यानंतर मात्र जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने उसंत घेतली. मात्र आज सकाळी पुन्हा हिंगोलीच्या वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचा पाहायला मिळाला आहे. सध्या धुक्याची दाट चादर पाहायला मिळालेली आहे आणि यामुळे आता पाऊस उसंत घेतोय, अशी अपेक्षा शेतकरीवर्ग करू लागले आहेत.

Continues below advertisement

वाशिम जिल्ह्यात दाट धुक्याची चादर

वाशिम जिल्ह्यात काल (15 सप्टेंबर) सायंकाळच्या दरम्यान झालेल्या जोरदार पावसामुळे वातावरणात चांगलाच बदल झाल्याच पहावयास मिळालं. रात्रभर झालेला रिमझिम पावसानंतर पाहटेच्या सुमारास जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दाट धुक्याची चादर पसरल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे. दाट धुक्यामूळे दृश्यमांनता कमी झाल्याने वाहनधारक, वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. याच बरोबर धुक्यामूळे भाजीपाला, पिकांसह फळ पिकांना मोठा फटका बसण्याच चिन्ह आहे.

हेही वाचा