एक्स्प्लोर

Unseasonal Rain: गारपीट अन् वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने पूर्व विदर्भाला झोडपलं! शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला

राज्यात तापमानाचा पारा प्रचंड वाढला असून बहुतांश ठिकाणी सामान्य तापमानाहून अधिक तापमानाची नोंद होत आहे. अशातच पूर्व विदर्भाला गारपीट, वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढलं आहे.

Maharashtra Weather Update : राज्यात तापमानाचा पारा प्रचंड वाढलाय. बहुतांश ठिकाणी सामान्य तापमानाहून अधिक तापमानाची नोंद होत आहे. अशातच पूर्व विदर्भाला (Vidarbha Weather) गारपीट, वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) अक्षरक्ष: झोडपून काढलं आहे. गोंदिया जिल्ह्यात काल (28 एप्रिल) पुन्हा वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी गारपीट व जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेला गारपिट व अवकाळी पावसामुळे अनेक नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक शेतकऱ्यांचे धान पीक आणि मका पिक हे आता कापणीला आले आहेत.  त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा हा पाऊस असून याचा फटका शेतकऱ्यांना पडत असल्याचे  चित्र आहे.

वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील अनेक घरांचे व पिकांचे देखील नुकसान झाले आहे. यात चिखली येथील खुशाल भेंडारकर यांच्या घरावरील छत उडाले आहे. तर एक झाड उन्मळून पडले असून जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये गारपीट झाली आहे. तर दुसरीकडे चिखली गावातील विद्युत खांब पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झालाय.

आमदार बडोले यांनी केली नुकसानीची पाहणी, तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश

गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील राका, चिखली, मनेरी, कोकणा व खोबा या गावांमध्ये अवकाळी पाऊस व वादळामुळे धान पिके व राहत्या घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसानग्रस्त भागाची आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी पाहणी केली. पाहणी दरम्यान आमदार राजकुमार बडोले यांनी शेतकरी व नागरिकांशी संवाद साधून, नुकसान ग्रस्त पिके व घरे यांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश तहसील प्रशासन व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच शासनाकडून लवकरात लवकर आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. अवकाळी पाऊस आणि जोरदार वादळामुळे सडक अर्जुनी तालुक्यात शेतकरी व नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, अनेक शेतकरी संकटात सापडले आहेत. सर्वांच्या सहकार्याने तातडीने पंचनामे पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासन स्तरावर अहवाल सादर केला जाणार आहे.

वादळी वाऱ्याचा आंबा पिकाला फटका; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

गोंदिया जिल्ह्यात काल सायंकाळी वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः आंबा पिक झाडांवरून गळून पडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. देवरी तालुक्यात अनेक भागात आंबा पिकाच्या बागेमध्ये अक्षरशः आंब्याचे खच पडले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी पावले उचलावीत, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Women's Day Wishes 2026 : जागतिक महिला दिनानिमित्त तुमच्या आयुष्यातील महिलांवर करा शुभेच्छांचा वर्षाव; पाठवा 'हे' हटके मेसेजेस
जागतिक महिला दिनानिमित्त तुमच्या आयुष्यातील महिलांवर करा शुभेच्छांचा वर्षाव; पाठवा 'हे' हटके मेसेजेस
Horoscope Today 8 March 2026: आजचा रविवार दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! सूर्यदेवाच्या कृपेने अडचणींतून सुटका, आजचे राशीभविष्य वाचा..
आजचा रविवार दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! सूर्यदेवाच्या कृपेने अडचणींतून सुटका, आजचे राशीभविष्य वाचा..
प्रिंटिंगचा शोध जेवढा मोठा तितकाच AI तंत्रज्ञानाचा शोधही मोठा, पण त्याचे दुष्परिणाम होणार : राजीव खांडेकर 
प्रिंटिंगचा शोध जेवढा मोठा तितकाच AI तंत्रज्ञानाचा शोधही मोठा, पण त्याचे दुष्परिणाम होणार : राजीव खांडेकर 
शेतात पाईपलाईनचे काम सुरु असताना मोठी दुर्घटना, कराडमध्ये मातीच्या ढिगार्‍याखाली सापडून दोन मजुरांचा मृत्यू
शेतात पाईपलाईनचे काम सुरु असताना मोठी दुर्घटना, कराडमध्ये मातीच्या ढिगार्‍याखाली सापडून दोन मजुरांचा मृत्यू

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
Embed widget