Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर; राज्यसभेचा देणार राजीनामा, एनडीएच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता
Maharashtra News Live Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या आणि महत्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स, एका क्लिकवर

पार्श्वभूमी
Maharashtra News Live Updates: पश्चिम बंगालचा गड 15 वर्षानंतर हातून गेल्यानं अस्वस्थ झालेल्या ममता बॅनर्जींनी काल पत्रकार परिषद घेतली. आपण हरलो नाही मग राजीनामा कसा देणार, असं म्हणत ममता बॅनर्जींनी...More
खासदार सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट
मुलीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी सुळे दांपत्य राज ठाकरे यांच्या भेटीला
राज ठाकरे, शर्मिला ठाकरे आणि उर्वशी ठाकरे यावेळी उपस्थित
नाशिकमध्ये नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी माणुसकीचे दर्शन घडवत एका 74वर्षीय वृद्ध महिलेच्या तक्रारीची तत्काळ दखल घेऊन तिचा अर्ज स्वीकारून संबंधितावर कारवाई करण्याचे आदेश दिले. नाशिक पोलीस आयुक्त कार्यालयात आरोग्य विभागातील सेवानिवृत्त असलेल्या मंगला पाटेकर या पोलीस आयुक्तांच्या भेटीसाठी आल्या होत्या. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या स्वागताकरता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी वयोवृद्ध महिला या पोलीस आयुक्तालयाच्या पायरीवर बसलेल्या असल्याचं बघून त्यांच्या जवळ जाऊन त्यांची तक्रार समजून घेत तत्काळ पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलीस गाडीमध्ये त्यांना पाठवून संबंधित प्रकरणावर तत्काळ कारवाईचे आदेश दिले. रोहित लोहकने नामक व्यक्तीने 2016 पासून पाटेकर या वृद्ध दांपत्यास मदतीचा आश्वासन देऊन त्यांच्याकडून वेळोवेळी 50 ते 55 लाख रुपये लुबाडून त्यांची फसवणूक केली आहे आणि त्या संदर्भात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक तात्काळ या प्रकरणाची चौकशी करून कारवाईचे आदेश दिले. विजया रहाटकर ह्या देखील पोलीस आयुक्तालयामध्ये दाखल झाल्या आणि त्यांनी देखील या महिलेची विचारपूस करून प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.
हुंड्यासाठी छळाला कंटाळून विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आपली जिवनयात्रा संपवली..
राहाता तालुक्यातील एकरुखे येथील धक्कादायक घटना...
प्रिया शुभम ढगे ( वय 23 ) अस मृत विवाहितेचे नाव...
घराच्या बांधकामासाठी चार लाख रुपयांच्या मागणीसाठी सासरकडून विवाहितेचा सतत छळ...
पती शुभम ढगे, सासरा राजेंद्र ढगे आणि सासू प्रतिभा ढगे ( सर्व राहणार को-हाळे , तालुका - राहाता , अहिल्यानगर ) यांच्या विरोधात राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..तिघही आरोपींना पोलिसांकडून अटक...
2024 ते 2026 दरम्यान मानसिक आणि शारीरिक छळ सुरू असल्याची माहिती...
छळ सहन न झाल्याने महिलेने उचलले टोकाचे पाऊल...
घटनेनंतर परिसरात खळबळ, पोलिसांचा पुढील तपास सुरू...
आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल...
- राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर नाशिक पोलिस आयुक्तालयात...
- नाशिकच्या पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्तांसह भोंदू खरात प्रकरणातील एसआयटीच्या पथकासोबत करणार चर्चा ...
- भोंदू अशोक खरात प्रकरण आणि TCS प्रकरण संदर्भात माहिती घेण्यासाठी विजया रहाटकर पोलीस आयुक्तालयात दाखल...
- भोंदू अशोक खरात आणि टीसीएस प्रकरणातील एसआयटी सोबत करणार चर्चा करून तपासाचा घेणार आढावा...
सोलापुरात 55 वर्षाच्या इसमाने 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा केला विनयभंग
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या 55 वर्षाच्या नराधमाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याप्रकरणी फुलचंद घाटांगरे याच्या विरोधात पोलीस आयुक्तलाच्या हद्दीत गुन्हा दाखल
पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून करण्यात आला गुन्हा दाखल
सोमवारी सायंकाळच्या सुमारास पीडित मुलगी आपल्या घरासमोर खेळत असताना आरोपीने दारूच्या नशेत तिचा विनयभंग केल्याचा आरोप
याप्रकरणी आरोपी फुलचंद घाटांगरे याला सोलापूर शहर पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरूय
सोलापुरातील ज्येष्ठ कवी, गीतकार तथा साहित्यिक माधव रामचंद्र पवार यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. मागील 12-13 वर्षांपासून ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. या काळात त्यांनी तब्बल 1 हजार 650 डायलिसिस पूर्ण करून मृत्युशी कडवी झुंज दिली होती.
माधव पवार यांनी सोलापुरातील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयात ३५ वर्षे वरिष्ठ लिपिक म्हणून सेवा बजावली. ‘हे शुभशकुनांचे पक्षी’ आणि ‘गरूडभरारी’ हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध असून, राज्यस्तरीय 21 पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते. तसेच 79 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागत गीत लिहिण्याचा मानही त्यांना मिळाला होता.
त्यांच्या गीतांना सुरेश वाडकर, आनंद शिंदे, आदर्श शिंदे यांसारख्या नामवंत गायकांनी स्वर दिले होते. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच सोलापुरातील साहित्य, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरानी श्रद्धांजली अर्पण केली.
देशात जनगणना आणि जातिनिहाय सर्वेक्षणाची चर्चा सुरू असतानाच, सायबर गुन्हेगारांनी याचा गैरफायदा घेण्यास सुरुवात केली आहे. बनावट फॉर्म आणि संशयास्पद लिंक्सद्वारे नागरिकांची वैयक्तिक व आर्थिक माहिती चोरण्याचे प्रकार वाढल्याने पोलिसांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. सायबर चोरटे स्वतःला सरकारी अधिकारी किंवा एजंट असल्याचे भासवून लोकांकडे संपर्क साधतात. सोशल मीडिया, व्हॉट्सॲप किंवा एसएमएसद्वारे जनगणना फॉर्म किंवा सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली लिंक्स पाठवल्या जातात. या माध्यमातून नागरिकांकडून खालील संवेदनशील माहिती मागितली जाते यात आधार आणि पॅन कार्ड, तपशील,बँक खाते क्रमांक, ओटीपी आणि पिन मागितला जातो.
अधिकृत जनगणना प्रक्रिया कधीही फोन किंवा व्हॉट्सॲपवरून तुमची वैयक्तिक किंवा बँक खात्याची माहिती मागत नाही. फसवणूक टाळण्यासाठी सायबर पोलिसांनी खालील मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत, कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका किंवा गुगल फॉर्मवर आपली माहिती भरू नका. आपला ओटीपी, पिन किंवा पासवर्ड कोणाशीही शेअर करू नका. केवळ शासनाच्या अधिकृत वेबसाईटचाच वापर करावा, फसवणूक झाल्यास त्वरित १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा जवळच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी.
सध्या राज्यात नसरापूरच्या घटनेवरून समाजमन संतप्त आहेय. याच प्रकारची संतापजनक घटना अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातल्या चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत घडलीये. चान्नी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या एका गावात एका 60 वर्षीय वृद्धाने शेजारी राहणाऱ्या दहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केलाय. मुलीचे आई-वडील शेतात मोलमजुरी करायला गेल्यानंतर शेजारीच राहणाऱ्या वृद्धाने या चिमुकलीवर चार ते पाच दिवसांपासून वारंवार अत्याचार केलाय. पीडित चिमुकली आधी भीतीमुळे घरी सांगत नव्हतीय. मात्र, काल पीडित मुलीने ही बाब आई-वडिलांना सांगितल्यानंतर यासंदर्भात चान्नी पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आलीये. यासंदर्भात आरोपी वृद्धावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. घटनेनंतर तो फरार झालाय. पोलिसांची तीन पथकं आरोपींच्या शोधासाठी रवाना झालीयेत.
सोलापूर - पंढरपूर तालुक्यातील सुस्ते गावात नृत्यांगना राधा पाटील हिच्या कार्यक्रमात उपस्थितांचा गोंधळ
दोन दिवसांपूर्वी याच ठिकाणी पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथे गौतमी पाटील हीच आहे कार्यक्रम झाला होता आणि तो तुफानी गर्दीत शांततेत पार पडला होता
मात्र काल सुस्ते ता पंढरपूर येथे राधा पाटील यांच्या कार्यक्रमात किरकोळ कारणावरून वाद झाल्याने तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे.
प्रचंड गोंधळ झाल्याने राधा पाटील यांचा कार्यक्रम बंद करण्यात आला. गौतमीचा कार्यक्रम ओके मात्र राधा पाटील च्या कार्यक्रमात मोठा राडा
सध्या गावोगावी यात्रा आणि जत्रा सुरू असून पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथे सुरू असलेल्या यात्रेत काल नर्तकी राधा पाटील हिचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता .. मात्र कार्यक्रमाच्या अखेरच्या टप्प्यात किरकोळ कारणावरून झालेल्या बाचाबाची चे परिवर्तन हाणामारीत होऊन जोरदार राडा झाला. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी याच ठिकाणी गौतमी पाटील हिचाही कार्यक्रम जत्रेच्या काळात घेण्यात आला होता मात्र तुफानी गर्दी होऊ नये हा कार्यक्रम शांततेत पार पडला..
काल झालेल्या राधा पाटील च्या कार्यक्रमात मात्र अखेरच्या टप्प्यात दोन तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली आणि याचे रूपांतर नंतर हाणामारीत झाले .. पोलिसांनी तात्काळ कार्यक्रम थांबून गर्दीला शांत केले.
सध्या उन्हाचा पारा वाढलेला असताना कुलरचा वापरही मोठ्या प्रमाणात होत आहे मात्र याच कुलरमुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याची घटना घडलीय.बीडच्या घाटनांदूर येथे कुलरमध्ये पाणी भरत असताना विजेचा तीव्र धक्का लागल्यान २६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झालाय.घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबाचा आधार कायमचा हिरावला गेला आहे.नजीर खदीर सय्यद असे मृत तरुणाचे नाव आहे.नजीर हा नेहमीप्रमाणे कामावर जाण्याच्या तयारीत असताना घरातील लोखंडी कुलरमध्ये पाणी टाकत होता. यावेळी अचानक कुलरमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने त्याला विजेचा जोरदार धक्का बसला आणि तो कोसळला.पत्नी आणि वडिलांनी तातडीने वीजपुरवठा बंद करून त्याला उपचारासाठी स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले.मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले.दुर्दैवाने तिथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
पर्वतीमधील अनर्थ कसा टळला याबाबत माहिती..
नराधम आजोबा आरोपीला नातू आणि नात भेटण्यासाठी आले होते.. आजोबा आरोपीने नातूला पैसे दिले आणि खाऊ खाऊन ये अस सांगितल..
नंतर आरोपीने अल्पवयीन मुलीच्या अंगावरील कपडे काढली स्वतःच्या देखील अंगावरील कपडे काढले
आरोपी पत्र्याच्या घरात राहिला असल्याने एका महिलेचे लक्ष गेलं आणि हा सगळा प्रकार उघडकीस आला...
पर्वती परिसरातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आजोबा आणि त्यांच्या मुलीचे फार काही संबंध नव्हते
आजोबांच्या स्वभावामुळे त्याच कुटुंबासोबत फार सबंध नव्हते
आजोबा अंबादास जाधव याने नात रडायला लागल्यावर माळ्यावर ठेवलं
9 वर्षाच्या मुलीने रात्री छातीत दुखत असल्याचं पोलिसांना सांगितलं
काही दिवसांपूर्वी ज्या घरात हा प्रकार घडला ती पत्र्याची खोली भाड्याने दिली होती
पर्वतीमधील अनर्थ कसा टळला याबाबत माहिती..
नराधम आजोबा आरोपीला नातू आणि नात भेटण्यासाठी आले होते.. आजोबा आरोपीने नातूला पैसे दिले आणि खाऊ खाऊन ये अस सांगितल..
नंतर आरोपीने अल्पवयीन मुलीच्या अंगावरील कपडे काढली स्वतःच्या देखील अंगावरील कपडे काढले
आरोपी पत्र्याच्या घरात राहिला असल्याने एका महिलेचे लक्ष गेलं आणि हा सगळा प्रकार उघडकीस आला...
पर्वती परिसरातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आजोबा आणि त्यांच्या मुलीचे फार काही संबंध नव्हते
आजोबांच्या स्वभावामुळे त्याच कुटुंबासोबत फार सबंध नव्हते
आजोबा अंबादास जाधव याने नात रडायला लागल्यावर माळ्यावर ठेवलं
9 वर्षाच्या मुलीने रात्री छातीत दुखत असल्याचं पोलिसांना सांगितलं
काही दिवसांपूर्वी ज्या घरात हा प्रकार घडला ती पत्र्याची खोली भाड्याने दिली होती
पर्वतीमधील अनर्थ कसा टळला याबाबत माहिती..
नराधम आजोबा आरोपीला नातू आणि नात भेटण्यासाठी आले होते.. आजोबा आरोपीने नातूला पैसे दिले आणि खाऊ खाऊन ये अस सांगितल..
नंतर आरोपीने अल्पवयीन मुलीच्या अंगावरील कपडे काढली स्वतःच्या देखील अंगावरील कपडे काढले
आरोपी पत्र्याच्या घरात राहिला असल्याने एका महिलेचे लक्ष गेलं आणि हा सगळा प्रकार उघडकीस आला...
पर्वती परिसरातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आजोबा आणि त्यांच्या मुलीचे फार काही संबंध नव्हते
आजोबांच्या स्वभावामुळे त्याच कुटुंबासोबत फार सबंध नव्हते
आजोबा अंबादास जाधव याने नात रडायला लागल्यावर माळ्यावर ठेवलं
9 वर्षाच्या मुलीने रात्री छातीत दुखत असल्याचं पोलिसांना सांगितलं
काही दिवसांपूर्वी ज्या घरात हा प्रकार घडला ती पत्र्याची खोली भाड्याने दिली होती
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर..
सुनेत्रा पवार देणार राज्यसभेचा राजीनामा
पोटनिवडणुकीत विजयी झाल्यानंतर पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर..
एनडीएच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता..
पुणेकरांना दिलासा
पाणीकपात ३१ मेपर्यंत लांबणीवर
पुणेकरांसाठी दिलासादायक निर्णय घेत महापालिकेने ३१ मेपर्यंत पाणीकपात न करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या धरणांमध्ये १०.१३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असून तो गतवर्षीपेक्षा अधिक आहे.
‘एल निनो’मुळे कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने १५ टक्के कपातीची मागणी केली होती.
मात्र, सध्याच्या परिस्थितीत कपात टाळण्यात आली आहे. पुढील स्थितीचा आढावा ३१ मेनंतर घेतला जाणार असून आवश्यकतेनुसार निर्णय होणार आहे.
शेतकऱ्यांचा शेतमाल विकण्यासाठी आता सार्वजनिक बांधकाम विभागाचा पुढाकार
प्रत्येक टोल नाक्यावर बांधणार शेतकऱ्यांसाठी मॉल
शेतकरी या मॉलमधून शेतमाल विकणार
शेतातून थेट टोल नाक्यावर शेतमाल शेतकरी विकणार
तर प्रवासी या टोल नाक्यावरील माॅलमधून ताजी भाजी आणि शेतमाल विकत घेणार
यासाठी प्रत्येक टोल नाक्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग शेतमालासाठी माॅल बांधणार
शेताच्या जवळ विक्री केंद्र असल्याने याचा फायदा शेतक-यांना होणार तर मार्केट पेक्षा स्वस्त आणि ताजी भाजी मिळत असल्याने ग्राहकांना ही याचा फायदा होणार
याआधी भाजप सरकारने शहरात आठवडी बाजार सुरु करुन शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठ तयार केली होती
केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पश्चिम बंगालमध्ये हिंसा भडकवणाऱ्यांवर आणि तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी पश्चिम बंगालचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक , कोलकाता पोलिस आयुक्त आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांच्या महासंचालकसह सर्व जिल्हाधिकारी , पोलीस अधीक्षक आणि पोलिस अधिकाऱ्यांना सतत गस्त घालण्याचे आदेश दिले आहेत. पश्चिम बंगालमध्ये हिंसा भडकवणारे आणि तोडफोड करणऱ्यांना तात्काळ अटक करण्यात येईल.
पश्चिम द्रुतगती मार्गावर (WEH) var दिंडोशी परिसरात अपघात
हायवेवर कार चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव कार दुसऱ्या कारला धडकल्याने झाला अपघात
सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही मात्र आघात दोन्ही गाड्यांचं मोठ नुकसान
अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती
मुंबईतील जे जे रुग्णालय येथे डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यू प्रकरणी ‘डेथ ऑडिट’ सुरू करण्यात आले आहे. मृत्यूचे नेमके कारण, उपचाराची वेळ आणि प्रक्रियेत काही विलंब झाला का याचा तपास केला जात आहे.
प्राथमिक तपासात अन्न विषबाधा नाकारण्यात आली असून, मृतांच्या शरीरात विषारी रसायनांचे अंश आढळले आहेत. फॉरेन्सिक अहवालातही याची पुष्टी झाली आहे.
या ऑडिटमध्ये रुग्णांचे मेडिकल रेकॉर्ड, दाखल होण्याची वेळ, लक्षणे आणि दिलेला उपचार यांचा सखोल आढावा घेतला जात आहे. तसेच सुरुवातीला स्थानिक डॉक्टरांकडून दिलेला उपचार योग्य होता का, आणि रुग्णांना वेळेत मोठ्या रुग्णालयात हलवले गेले का, याचाही तपास होणार आहे.
२६ एप्रिल रोजी अल्पावधीत सर्व रुग्णांना समान लक्षणांसह दाखल करण्यात आले होते. काहींना आधी इतर रुग्णालयात उपचार देऊन नंतर JJ रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र सर्वांचा मृत्यू झाला.
मायक्रोबायोलॉजी आणि पॅथॉलॉजी अहवालांची प्रतीक्षा असून, त्यावरून मृत्यूचे निश्चित कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, पोलिसही या अहवालावर आधारित पुढील कारवाई करणार असून, उपचार प्रक्रियेत काही त्रुटी आढळल्यास दोषींवर कारवाई केली जाईल.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर
६ मे दुपारी दिल्लीत पोहोचणार
बारामती पोटनिवडणुकीत विजय मिळाल्यानंतर सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर
विधानसभेत निवडून आल्यानंतर आता नियमाप्रमाणे राज्यसभेचा राजीनामा अपेक्षित
सुनेत्रा पवारांची दिल्लीत NDA वरिष्ठ नेत्यांचीही भेट होण्याची शक्यता
अभिनेता विजयची विधीमंडळ नेतेपदी निवड, सत्ता स्थापनेसाठी टीव्हीकेची काँग्रेससह छोट्या पक्षांना साद, उद्या विजय मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर; राज्यसभेचा देणार राजीनामा, एनडीएच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता