Maharashtra News Live Updates: तीन दिवसांच्या सुट्ट्यांचा परिणाम; पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी

Maharashtra News Live Updates:

मुकेश चव्हाणLast Updated: 01 May 2026 02:21 PM

पार्श्वभूमी

Maharashtra News Live Updates: आज 1 मे महाराष्ट्र दिन... महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यातील सरकारी इमारती, प्रशासकीय कार्यालयं आणि ऐतिहासिक वास्तूंना सजावट करण्यात आलीये. सरकारी इमारती तिरंगी रंगात न्हाऊन निघाल्यात...आज 1 मेचा दिवस...More

विद्युत डीपीतील स्पार्किगमुळे घरांना लागली आग; परभणीच्या मानवत तालुक्यातील पाळोदी गावातील घटना 

परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील पाळोदी गावात विद्युत डीपीत झालेल्या स्पार्किंगमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली.या आगीने काही क्षणांतच आसपासच्या घरांना कवेत घेतल्याने परिसरात मोठी घबराट पसरली.मात्र, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. गावकऱ्यांनी प्रसंगावधान राखत मोठ्या धैर्याने आणि एकजुटीने आग विझवण्याचे प्रयत्न केले. त्यांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.दरम्यान, गावात त्याच दिवशी लग्नसमारंभ सुरू असल्याने आनंदाच्या वातावरणात अचानक भीतीचे सावट पसरले होते. आगीमुळे काही प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले असून नेमके नुकसान किती झाले याचा अंदाज घेतला जात आहे.या घटनेनंतर परिसरात वीज यंत्रणेच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित विभागाने तात्काळ दखल घेण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.