गुडन्यूज! घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना 10 टक्के मोफत वाळू मिळण्याचा मार्ग मोकळा; राज्याच्या वाळू धोरणात मोठे बदल
Sand Policy: प्रधानमंत्री आवास योजना (Pradhan Mantri Awas Yojana) तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील घरकुल योजनेच्या (Gharkul Yojana) लाभार्थ्यांसंदर्भात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

Mumbai News: प्रधानमंत्री आवास योजना (Pradhan Mantri Awas Yojana) तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील घरकुल योजनेच्या (Gharkul Yojana) लाभार्थ्यांसंदर्भात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. या योजनेतील लाभार्थांना 10 टक्के मोफत वाळू मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने गरिबांच्या घरकुलाला वाळू (Sand Policy) मिळण्यासाठी पुढाकार घेत सुधारित शासन निर्णय जारी केला आहे. तर लिलावधारकांचा आर्थिक बोजा सरकार उचलणार असल्याची माहिती आता समोर आली आहे.
राज्याच्या वाळू धोरणात मोठे बदल (Major Changes in State Sand Policy)
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील वाळू व्यवस्थापन आणि घरकुल योजनांना गती मिळण्यासाठी तीन वर्षांतून एकदा होणारा लिलाव आता दरवर्षी होणार आहे. खाणकाम आराखडा, पर्यावरण परवानगी आणि इतर आवश्यक परवानग्यांचा कालावधीही आता एक वर्षाचा असणार आहे.
नागपूरमध्ये सहदुय्यम निबंधकाचं निलंबन, ड्रॉवरमध्ये आढळले होते पैसे (Sub-Registrar Corruption Case)
नागपूरमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या सहदुय्यम निबंधकाचं अखेर निलंबन करण्यात आलं आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काहीच दिवसांपूर्वी दुय्यम निबंधक कार्यालयात अचानक धाड टाकली होती. यावेळी कार्यालयाची झाडाझडती घेण्यात आली. या झाडाझडतीदरम्यान सहदुय्यम निबंधकाच्या ड्रॉवरमध्ये पैसे आढळले. या गंभीर प्रकारानंतर महसूलमंत्री बावनकुळे यांनी तात्काळ निलंबनाचे आदेश दिले होते. त्यांच्या आदेशानुसार या निबंधकाचं अखेर निलंबन करण्यात आलं आहे. सामान्य जनतेच्या कामांसाठी पैसे घेतल्याशिवाय काम होत नाही, अशा तक्रारी महसूलमंत्र्यांना मिळाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत त्यांनी ही कारवाई केली. या घटनेमुळे प्रशासनात पारदर्शकतेची अपेक्षा वाढली आहे.
वाळू माफियाच्या वाहनानं कट मारल्यानं अपघात; SDMच्या अपघात प्रकरणात ट्विस्ट Bhandara SDM Accident Case)
भंडाऱ्याच्या उपविभागीय अधिकारी माधुरी तिखे यांच्या वाहनाचा पहाटे भंडाऱ्याच्या पचखेडी ते दवडीपार या मार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात SDM माधुरी तिखे यांच्यासह त्यांचे पती जखमी झालेत. माधुरी तिखे यांच्यावर भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. मात्र, या अपघाताचा नवा ट्विस्ट समोर आलाय.
SDM तिखे या शासकीय वाहन क्रमांक MH 36 AR 578 ने वाळूची वाहतूक करणारा ट्रक क्रमांक MH 36 AA 4106 चा पाठलाग करीत होत्या. दरम्यान, ट्रकवर कारवाई होणार, या भीतीनं एका वाळू माफियानं त्याची बोलेरो (वाहन क्रमांक MH 36 AL 2853 हे भरधाव वेगानं आणि SDM यांच्या शासकीय वाहनाच्या माधामधात चालवून वारंवार स्पीड वाढविणे आणि ब्रेक मारणे आणि शासकीय वाहनाला पुढं जाण्यासाठी रस्ता नं देणे असा प्रकार करून शासकीय वाहनाला कट मारल्यानं SDM यांच्या वाहनाचं संतुलन बिघडलं आणि वाहन रस्त्याच्या लगत असलेल्या भातपिकाच्या शेतात उलटलं. याप्रकरणी SDM माधुरी तिथे यांच्या तक्रारीवरून कारधा पोलिसांनी बोलेरो पिकप वाहन चालक आणि ट्रक चालकाच्या विरोधात हत्येचा प्रयत्न यासारख्या गंभीर गुन्ह्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, यात आणखी नवा ट्विस्ट समोर आला असून वाळू माफियांच्या वाहनांवर पहाटेला कारवाई करण्याकरिता निघालेल्या SDM माधुरी तिखे त्यांनी त्यांच्या अधिनस्त महसूल विभागाचा कुठलाही अधिकारी किंवा महसूल विभागाच्या कर्मचाऱ्याला का नेलं नाही? त्यांना महसूल कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून वाळू माफियांपर्यंत माहिती लिक होईल अशी शंका होती म्हणून त्यांनी कोणाला सोबत घेतले नाही की, त्यामागे इतर काही कारण होते, हे स्पष्ट झालेले नाही. विशेष म्हणजे शासकीय वाहन नेत असताना शासकीय वाहन चालकाला नं नेता पतीसोबतच त्या का गेल्यात? असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरीत आहेत.
महत्वाच्या बातम्या:



















