Live News Updates: अकोल्यात आज तापमानाचा पारा 46 अंश पार करणार? उन्हामुळे रस्त्यांवर अघोषित संचारबंदी

Maharashtra News Live Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर...

मुकेश चव्हाणLast Updated: 26 Apr 2026 03:59 PM

पार्श्वभूमी

Maharashtra News Live Updates: अमेरिका आणि इराण यांच्यातील बेबनाव कायम आहे. उभय देशांमधील शांतीवार्तेची दुसरी फेरी पुन्हा फिस्कटली आहे. पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चर्चेच्या दुसऱ्या फेरीसाठी स्टीव्ह विटकॉफ आणि जार्ड कुशनर यांचा दौरा...More

मुंबईत उन्हाचा तडाखा! पारा थेट 39 अंशांवर; मुंबईकरांची उन्हाच्या झळांमुळे घराबाहेर पडण्यास टाळाटाळ

मुंबईमध्ये उन्हाचा तडाखा वाढला असून, एप्रिल महिन्यात आज तापमान थेट ३९ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. हवामान विभागाने रविवारी आणि सोमवारी मुंबई शहर तसेच आसपासच्या जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता, तो आज खरा ठरला. वाढत्या उष्णतेमुळे मुंबईकरांनी बाहेर पडण्याऐवजी घरी राहण्यास पसंती दिली आहे.