Maharashtra News Live Updates: लातूरमध्ये उष्माघाताने नऊ महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाल्याचा संशय, जिल्ह्यातील मृतांचा आकडा दोनवर

Maharashtra News Live Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर...

मुकेश चव्हाणLast Updated: 25 Apr 2026 03:36 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Live Blog Updates: भिवंडीतील राहनाळ गावात राहणाऱ्या 35 वर्षीय नितीन विश्वनाथ वाघमारे यांच्या छातीत दुखू लागल्याने अंजुरफाटा परिसरातील नोबेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे रात्री आला. तेथील डॉक्टर अफात खान यांनी...More

Latur News: लातूरमध्ये उष्माघाताने नऊ महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाल्याचा संशय, जिल्ह्यातील मृतांचा आकडा दोनवर

लातूर जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असून औसा तालुक्यातील गोंद्री येथे ९ महिन्यांच्या बाळाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काही दिवसांपूर्वी औराद शहाजनी येथे ६० वर्षीय शेतकऱ्याचाही उष्माघाताने मृत्यू झाला होता, त्यामुळे जिल्ह्यातील मृतांचा आकडा दोनवर पोहोचला आहे.


सध्या तापमान ४० ते ४१ अंश सेल्सिअसपर्यंत जात असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकरी वर्ग धोक्यात आहेत. आरोग्य विभागाने नागरिकांना दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि विशेषतः लहान मुलांची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.