Maharashtra Live News Updates: मीनाक्षी शिंदे-राजा शिंदेंची नार्को टेस्ट करा, सुषमा अंधारेंची टीका
Maharashtra Live News Updates: मराठवाडा पदवीधर निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून प्रतापसिंह पाटील निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
LIVE

Background
Maharashtra Live News Updates: मराठवाडा पदवीधर निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून प्रतापसिंह पाटील निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने प्रतापसिंह पाटील यांनी गाठीभेटी सुरू केले असून लातूर हिंगोली नांदेड भागात दौरा सुरू आहे. मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे गेल्या तीन वेळेस राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे सतीश चव्हाण प्रतिनिधित्व करत आहेत. महायुतीत विद्यमान आमदारांना परत तिकीट दिले जाण्याची चर्चा आहे. महाविकास आघाडी कडून मराठवाड्याची जागा राष्ट्रवादीने दावा केला असून त्या अनुषंगाने तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे काँग्रेसनेही याबाबत बैठक घेत मराठवाड्याच्या जागेबाबत मागणी केल्याची माहिती आहे.
ठाकरे बंधूंच्या मोर्चाला डाव्या पक्षांचा पाठिंबा; शेकाप आंदोलनात सक्रिय सहभागी होणार
देशाचे निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात उद्या शिवसेना आणि मनसेने मोर्चा आयोजित केलाय. या आंदोलनाला राज्यातील सर्व डाव्या पक्षांनी पाठिंबा दिला आहे. शेतकरी कामगार पक्ष या आंदोलनात सक्रिय सहभागी होणार असून शेकापच्या कार्यकर्त्यांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी केलं आहे. निवडणूक आयोगासारखी सार्वभौम संस्था कायदे धाब्यावर बसवून काम करीत असल्याचा आरोप जयंत पाटलांनी यावेळी केलाय.
नागपूर पदवीधर मतदार संघ निवडणूक; खदखद मास्तर नितेश कराळे भरणार नामांकन अर्ज
ग्रामीण बोली भाषेत शिक्षण यासाठी प्रसिद्ध असणारे व खदखद मास्तर म्हणून परिचित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते राहिलेले नितेश कराळे मास्तर यांनी नागपूर पदवीधर मतदार संघाच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी तयारी चालविली आहे. पाच ऑक्टोबर रोजी नितेश कराळे नामांकन अर्ज दाखल करणार आहे. पदवीधर मतदारांच्या विविध समस्यांना घेऊन आपण मतदारापुढे जाणार आणि यात आपल्याला यश येईल असा विश्वास नितेश कराळे यांनी व्यक्त केला आहेय. काहीही झाले तर आपण अर्ज मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका कराळे मास्तरानी व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या





















