Maharashtra Live News Updates: मुंबादेवीत बेवारस बॅग सापडल्याने खळबळ; पोलिसांसह बॉम्ब शोध पथक घटनास्थळी दाखल

Maharashtra Live News Updates In Marathi: राज्यातील आणि देश-विदेशातील अशाच ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा...

Advertisement

मुकेश चव्हाणLast Updated: 31 May 2026 12:54 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Live News Updates In Marathi: जालन्यातील अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी सुरू केलेलं उपोषण मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी अखेर मागे घेतलं आहे. काल रात्री मराठा...More

धनंजय देशमुख यांच्यावर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

बीड ब्रेक: मृत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्यावर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल 


दादा खिंडकर यांचा भाऊ समाधान खिंडकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला 


एका हॉटेलवर जेवणासाठी बसले असताना धनंजय देशमुख याने अंगरक्षका जवळील पिस्टल काढून जीवे मारण्याची धमकी दिली 


या प्रकरणात ग्रामीण पोलीस ठाण्यात 192/2026, कलम 109,352,351,(2),3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे 


या प्रकरणाचा बीड पोलीस अधिक तपास करत आहेत परंतु या घटनेमुळे खळबळ उडाली आहे 


दोन दिवसांपूर्वी समाधान खिंडकर याने देशमुख हत्या प्रकरणातील साक्षीदार दादा खिंडकरला जीवे मारण्याची धमकी दिल्याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता

© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.