Maharashtra Live Blog Updates: कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर; मुंबई टेक वीक अधिक भव्य असेल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Maharashtra Live Blog Updates: मनोज जरांगे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी भाजप नेते प्रसाद लाड यांना मराठा आरक्षणबाबत चर्चा करण्यासाठी आंतरवलीमध्ये येण्याचं आवाहन केलं होतं.

पार्श्वभूमी
Maharashtra Live Blog Updates: भाजप नेते प्रसाद लाड आज मनोज जरांगेंची अंतरवलीमध्ये जाऊन भेट घेणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी भाजप नेते प्रसाद लाड यांना मराठा आरक्षणबाबत चर्चा...More
कल्याण पोलिसांनी महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी कारवाई केली आहे कल्याण अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत कुख्यात ‘पठाण गॅंग’चा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल ३४ कोटी रुपये किमतीचे ९ किलो ड्रग्ज जप्त( हेरॉईन) जप्त करण्यात आले असून, कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाण याच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. नाशिक हुन कल्याण मार्गे मुंबईत मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची तस्करी करून ते कल्याण आणि मुंबई परिसरात पुरवले जात होते. पठाण गँगचा मोरक्या अमजद पठाण यांच्या विरोधात याआधी देखील आंतरराज्यीय ड्रग्स तस्करी प्रकरणी तसेच हत्या सारखे गंभीर स्वरूपाचे 20 गुन्हे दाखल आहेत. अमजद पठाण सह त्याचे साथीदार कासिफ वसईकर ,सद्दाम शेख ,कृष्णा हळेमणी, गणेश अन जंगमार उर्फ अण्णा या ड्रग्स तस्करांना देखील पोलिसानी बेड्या ठोकल्या आहेत . हे रॅकेट आणखी मोठे असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात असून पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत .आज पर्यंतच्या इतिहासातील ठाणे जिल्ह्यातील ही मोठी कारवाई आहे .