Maharashtra Live Blog Updates: अजित दादांसाठी बारामती आईसारखीच होती, अजित पवारांच्या आठवणींनी सुनेत्रा पवार भावूक

Maharashtra Live Blog Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर...

मुकेश चव्हाणLast Updated: 06 Apr 2026 01:37 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Live Blog Updates: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामती पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत...आज दुपारी 12.30 वाजता प्रफुल पटेल, सुनिल तटकरे, छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर महत्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत...More

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक संदर्भात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची 'वेट ऑन वॉच' ची भूमिका

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक संदर्भात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची "वेट ऑन वॉच" ची भूमिका...


मुंबईतून पक्षाने दोन एबी फॉर्म पाठवले, मात्र अजूनही कोणीही अर्ज भरला नाही...


प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीनंतर प्राजक्त तनपुरे नेमकी काय निर्णय घेतात याकडे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे लक्ष...


राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून गोविंद मोकाटे आणि प्राजक्त तनपुरे यांच्यासाठी दोन अर्ज पाठवण्यात आले...


तीन वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत, शेवटच्या क्षणी कोण अर्ज दाखल करणार याकडे सर्वांचे लक्ष...

दिंडोशी संतोष नगर परिसरामध्ये काल पोलिसांनी दंगल घडवली; बजरंग दलाचे कार्यकर्त्यांचा आरोप 

दिंडोशी संतोष नगर परिसरामध्ये काल पोलिसांनी दंगल घडवली बजरंग दलाचे कार्यकर्त्यांचा आरोप 


बजरंग दलाचे कार्यकर्ता आणि पोलिसांमध्ये तुफान बाचाबाची 


कार्यकर्त्यांना ज्या ठिकाणी शोभायात्रा मध्ये हल्ला झाला होता त्याच ठिकाणी सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्यावरून आक्रमक झाले आहेत 


मात्र पोलीस त्यांना सांगत आहेत बाहेर हनुमान चालीसा पठण बाहेर करा त्या ठिकाणी पुन्हा कायदा सुव्यवस्था खराब होण्याची शक्यता आहे 


मात्र बजरंग दलाचा कार्यकर्ता आणि पोलिसांमध्ये तुफान गोंधळ सुरू आहे