Live Blog Updates: राज्यात पुढील 3 ते 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; विदर्भात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता
Maharashtra Live Blog Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स...

पार्श्वभूमी
Maharashtra Live Blog Updates: राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत मला आधीच माहिती होती असं पहिल्यांदाच सुनील तटकरेंनी मान्य केलं आहे. एबीपी माझाच्या पॉडकास्ट कार्यक्रमात तटकरेंनी जाहीर वक्तव्य केलंय. मात्र आपला राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला कधीच...More
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय
शिशुवर्ग ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर
दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावेंची माहिती
कॅबिनेट बैठकीत दिव्यांग विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मंजूर
शिशुवर्गाला वार्षिक १२०० रुपयांपासून ते बारावीपर्यंत १२ हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती मिळणार
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय
शिशुवर्ग ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर
दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावेंची माहिती
कॅबिनेट बैठकीत दिव्यांग विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मंजूर
शिशुवर्गाला वार्षिक १२०० रुपयांपासून ते बारावीपर्यंत १२ हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती मिळणार
राज्यात पुढील ३ ते ४ दिवस वादळी पावसाचा इशारा
विदर्भात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा
अमरावती, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये गारपिटीची शक्यता
मराठवाड्यात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
संध्याकाळ दरम्यान ४० ते ५० किमी प्रति ताशी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज
मध्य महाराष्ट्रात देखील सर्वत्र वादळी वाऱ्यांसह पाऊस, काही ठिकाणी ५० ते ६० किमी वादळी वारे वाहण्याची शक्यता
पुणे, सातारा आणि नाशिक जिल्ह्यातील काही भागात गारपीट होण्याचा इशारा
कोकणात देखील काही जिल्ह्यात हलक्या पावसाच्या सरींचा अंदाज
मुंबई, उपनगरांमध्ये देखील आज हलक्या सरींची शक्यता
चिंचवड स्टेशन परिसरात ट्रक उलटला, ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे नागरिक हैराण.....
चिंचवड स्टेशन परिसरात रस्त्यालगत खड्डा खोदण्याचे काम सुरू असताना एक ट्रक उलटल्याची घटना आज घडली. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र यामुळे शहरातील रस्ते कामांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
शहरात सध्या अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला खोदकाम सुरू आहे. मात्र, हे काम करताना ठेकेदारांकडून सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. कामाच्या ठिकाणी बॅरिकेट्स किंवा सूचना फलक नसल्यामुळे वाहनधारकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. यापूर्वीही अशाच प्रकारच्या निष्काळजीपणामुळे अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहेत. ठेकेदारांच्या या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनांनंतर आता पिंपरी-चिंचवड प्रशासन संबंधित ठेकेदारांवर कठोर कारवाई करणार का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
- अशोक खरात याला पहिल्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत रवानगी
- न्यायालयीन कोठडी मिळताच दुसऱ्या गुन्ह्यात ताबा मिळण्यासाठी तपास अधिकाऱ्यांचा न्यायालयात अर्ज
- तपास अधिकाऱ्यांचा न्यायालयाकडून अर्ज मंजूर
- अशोक खरात याला दुसऱ्या गुन्ह्यात ताब्यात घेण्याची न्यायालयाची दिली परवानगी
- अशोक खरात याला उद्या पुन्हा दुसऱ्या लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात ताब्यात घेणार
- उद्या पुन्हा सरकारी पक्षाकडून पोलिस कोठडीची मागणी केली जाणार
- अशोक खरात याला उद्या पुन्हा न्यायालयात हजर करणार
- अशोक खरात विरोधात नाशिकमधे 10 आणि शिर्डीत 1 असे एकूण 11 गुन्हे दाखल
-
- सर्व गुन्ह्यात त्याच्या पोलीस कोठडीची मागणी करणार
-
- 18 मार्च रोजी पहिल्यादा आरोपी ला न्यायालयात करण्यात आले होते हजर
सोलापुरात गॅसच्या रांगेत उभारलेल्या तरुणाला भोवळ
गॅससाठी उन्हात उभारल्यानंतर तरुणाला आली भोवळ
सोलापुरातल्या कुमठा नाका परिसरातील गॅस एजन्सी समोरील घटना
असमद रफिक शेख असे भोवळ आलेल्या तरुणाचे नाव
घरगुती गॅस मिळवण्यासाठी तसेच KYC करण्यासाठी लोकांची मोठी गर्दी गॅस एजन्सी समोर होतेय
सोलापुरात गॅसच्या रांगेत उभारलेल्या तरुणाला भोवळ
गॅससाठी उन्हात उभारल्यानंतर तरुणाला आली भोवळ
सोलापुरातल्या कुमठा नाका परिसरातील गॅस एजन्सी समोरील घटना
असमद रफिक शेख असे भोवळ आलेल्या तरुणाचे नाव
घरगुती गॅस मिळवण्यासाठी तसेच KYC करण्यासाठी लोकांची मोठी गर्दी गॅस एजन्सी समोर होतेय
सोलापुरात गॅसच्या रांगेत उभारलेल्या तरुणाला भोवळ
गॅससाठी उन्हात उभारल्यानंतर तरुणाला आली भोवळ
सोलापुरातल्या कुमठा नाका परिसरातील गॅस एजन्सी समोरील घटना
असमद रफिक शेख असे भोवळ आलेल्या तरुणाचे नाव
घरगुती गॅस मिळवण्यासाठी तसेच KYC करण्यासाठी लोकांची मोठी गर्दी गॅस एजन्सी समोर होतेय
परभणी शहरातील वसमत रस्त्यावर आज एलपीजीवर चालणाऱ्या ऑटोला अचानक आग लागल्याची घटना घडली. एमएच २२ ए पी ३२४२ क्रमांकाच्या या ऑटोमध्ये अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
आगीची तीव्रता जास्त असल्याने याचा वाहतुकीवर परिणाम झाला स्थानिक नागरिकांनी तत्काळ याची माहिती अग्निशमन दलाला दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाने वेळीच कार्यवाही करत आग आटोक्यात आणली.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, ऑटोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून अधिक तपास सुरू आहे.
मध्य रेल्वेच्या रुळांवर फ्री स्टाईल हाणामारी...
एक फुल दोन माळी, मुलीवरून दोन्ही तरुण भिडले असल्याची माहिती...
दोन तरुण यांची मारामारी प्रवासी कॅमेरात कैद...
सदर व्हिडीओ मुलुंड स्थानकाचा असल्याचं बोलल जात असून सध्या व्हायरल होत आहे.
प्रवाश्यान कडून ट्रेन येत असल्याचं सांगत असताना सुद्धा मारामारी सुरू...
प्रवाशाने ट्रेन आल्यावर दोन्ही तरुणांना बाजूला करून सोडविण्याचा प्रयत्न
मात्र रेल्वे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर... यावेळी घटना स्थळी पोलिस नसल्याचं चित्र..
या व्हायरल व्हिडिओची रेल्वे पोलिस तपास करून काय कारवाई करता याकडे लक्ष...
- सरकारी वकील अजय मिसर यांनी भोंदू अशोक खरातची केस लढण्यास दाखवली असमर्थता
- SIT ने विशेष सरकारी वकील अजय मिसर यांना ही केस चालवण्यासाठी लेखी पत्राद्वारे केली होती विनंती
- मात्र
- मात्र सरकारी वकील ॲड अजय मिसर यांनी केस चालवण्यास दिला नकार*
- 2011 मुंबई साखळी बॉम्ब स्फोट खटला,रवी पुजारी प्रकरणातील महाराष्ट्रातील सर्व खटले तसेच अन्य महत्वाच्या खटल्याच्या न्यायालयीन चौकशीच्या कामामुळे या प्रकरणाला वेळ व न्याय देता येणार नसल्याने विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी केस चालवण्यास नकार दिल्याची माहिती
* ॲड अजय मिसर यांनी नकार दिल्याने सहाय्यक सरकारी वकील शैलेंद्र बागडे हेच करणार युक्तिवाद.
घाटकोपर पोलिसांची कारवाई: देहविक्री रॅकेटचा भंडाफोड, आरोपी महिला अटक, दोन महिलांची सुटका
मुंबईतील घाटकोपर पोलिसांनी अंधेरी, साकीनाका आणि घाटकोपर परिसरात सुरू असलेल्या कथित देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात कांदिवली येथील 38 वर्षीय कविता माने हिला ताब्यात घेण्यात आले असून, ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना पैशाचे आमिष दाखवून ग्राहकांसाठी त्यांची व्यवस्था करत असल्याचा आरोप आहे.
घाटकोपर पोलिसांनी आरोपीविरुद्ध BNS कलम 143(3) तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा (Immoral Traffic Prevention Act) कलम 4 आणि 5 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना समजले की कविता माने ही घाटकोपर, साकीनाका आणि अंधेरी येथील हॉटेलमध्ये मुली पुरवत होती. पोलिसांनी बनावट ग्राहक (डमी कस्टमर) तयार करून आरोपीशी संपर्क साधला. आरोपीने स्वतःसह दोन महिलांचे फोटो पाठवले आणि प्रत्येक मुलीसाठी 30,000 रुपये मागितले.
यानंतर पोलिसांनी सापळा रचत घाटकोपर-अंधेरी लिंक रोडवरील एका लॉजमध्ये व्यवहार ठरवला. यावेळी पोलिसांनी बनावट नोटांचा वापर करून कारवाई केली. कविता माने दोन महिलांसह (वय 32 आणि 31) घटनास्थळी आली असता, पैशांची देवाणघेवाण करताना तिला रंगेहाथ पकडण्यात आले.
लातूर जिल्ह्यात हमीभावाने हरभरा खरेदीसाठी सुरू करण्यात आलेली तब्बल १३० खरेदी केंद्र सध्या ठप्प झाली आहेत… बारदाना उपलब्ध नसल्यामुळे गेल्या चार ते पाच दिवसांपासून या केंद्रांवर हरभरा खरेदी पूर्णपणे बंद आहे… त्यामुळे शेकडो शेतकरी अडचणीत सापडले असून, अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर त्यांची चिंता वाढली आहे.
लातूर जिल्ह्यात हमीभावाने हरभरा खरेदीसाठी मार्केटिंग फेडरेशन आणि पणन मंडळाच्या माध्यमातून १३० खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत… मात्र, या केंद्रांवर गेल्या चार ते पाच दिवसांपासून खरेदी पूर्णपणे ठप्प झाली आहे… यामागचे मुख्य कारण म्हणजे बारदान्याची कमतरता... पणन मंडळाकडून वेळेत बारदाना उपलब्ध न झाल्यामुळे सर्वच खरेदी केंद्रांवर व्यवहार थांबले आहेत… बारदान्याअभावी ठप्प झालेली हरभरा खरेदी आणि वाढती पावसाची शक्यता… या दुहेरी संकटामुळे सध्या हरभरा विक्रीसाठी नोंदणी केलेले शेतकरी अडचणीत सापडले आहेत…
मंत्री नरहरी झिरवळ आज मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार नाहीत...
आज दुपारी बारा वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक...
व्हिडिओ प्रकरणानंतर झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहणार, सूत्रांची माहिती...
झिरवळ सध्या मतदारसंघात आहेत
- भोंदू अशोक खरात चे राजकीय नेत्यांची हितसंबंध असताना काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखील चौकशी होण्याची शक्यता...
- अशोक खरात च्या मुलीच्या लग्नातील व्हीआयपी वऱ्हाडींचा घेतला जाणारा शोध...
- सत्ताधारी विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांसह वरिष्ठ अधिकारी देखील लग्न सोहळ्यात हजेरी असल्याची SIT कडे माहिती...
- *नाशिक, अहिल्यानगर, मुंबई दिल्लीसह काही परदेशी पाहुणे ही खरातच्या मुलीच्या लग्न सोहळ्यात होते उपस्थित...
- भोंदू अशोक खरातच्या संबंधित असलेल्या नेत्यांच्या भोवती संशयाचा वातावरण असताना काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखील SIT कडून माहिती गोळा करण्याचे काम सुरू...
- अशोक खरात च्या मुलीच्या लग्नात IAS आणि IPS अधिकारी पूर्णवेळ लग्नसोहळ्यात होते उपस्थित...
- लग्न सोहळ्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची यादी करून भोंदू अशोक खरात सोबतचे संबंध तपासण्यासाठी व्हीआयपी वऱ्हाडींची यादी तयार केल्याचे काम सुरू...
चिपळूण मध्ये वन विभागाकडून खासगी जागेत अतिक्रमण, संतप्त शेतकऱ्यांनी खांब रोवण्याचे काम रोखले.
तिवरे येथील घटनेनंतर आकले गावातला धक्कादायक प्रकार आला समोर... गावातील 39 हेक्टर खरेदी केलेल्या जागेवरून शेतकरी आणि कंपनी यांच्यात संघर्ष.
ओडिसा येथील खाजगी कंपनीने खरेदी केलेली जमीन वनविभागाला हस्तांतरित केल्यानंतर जागेचे सीमांकन करताना घोळ झाल्याचा स्थानिक शेतकऱ्यांचा आरोप
प्रत्यक्ष खरेदी केलेल्या जागेच्या ऐवजी शेतकऱ्यांच्या जागेत सीमांकन करून खांब रोवल्याने स्थानिक विरुद्ध ठेकेदार यांच्यात संघर्ष पेटला....संतप्त शेतकऱ्यांनी काम रोखले
जागेचे सीमांकन करताना स्थानिक जागा मालकांना कोणत्याही प्रकारच्या पूर्व सूचना न दिल्याचा शेतकऱ्यांचा आरोप..
ओडिसा येथील लॉईडस मेटल अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीकडून खरेदी केलेली जमीन वनविभागाला हस्तांतरित केल्यानंतर जागेच्या सीमेवरून होतोय वाद.
प्रशासनाचा अधिकारी प्रत्यक्ष हजर नसल्याने शेतकरी आणि कामगार यांच्यात होतोय संघर्ष.
बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात
पहिल्याच दिवशी ३ उमेदवाराचे अर्ज दाखल
हिंदुस्थान जनता पार्टी मधून सतीश कदम,शरद भिसे यांनी अपक्ष तर न्यू राष्ट्रीय समाज पार्टी तर्फे राजू घुटूकडे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे
पहिल्या दिवशी उमेदवारी अर्ज भरणारे हे तीनही उमेदवार बारामतीच्या बाहेरचे आहेत
कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्याने फिरवला कांदा शेतीवर नांगर
तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा गावच्या शेतकऱ्यांने दीड एकर कांदा टाकला नांगरून
बाळासाहेब रोचकरी असे कांद्यावर नांगर फिरवणाऱ्या शेतकऱ्याचे नाव..
या शेतकऱ्याने दीड एकर साठी 70 ते 75 हजार रुपये खर्च केला मात्र कांदा व्यापाऱ्याने कवडीमोल भावाने मागितल्याने शेतकरी अडचणीत
उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्याने कांदा टाकला जमिनीत गाढून
भारतात हवाई प्रवास मोठ्या प्रमाणात महागणार
हवाई इंधन अर्थात एटीएफच्या दरांमध्ये दुपटीपेक्षा जास्त वाढ
मुंबईत एटीएफच्या दरात 115% ची वाढ
- नागपुरात सोने तारण कर्ज घोटाळा उघड बनावट दागिन्यांवर कर्ज उचलून बँकेची फसवणूक
- आयसीआयसीआय बँ च्या ९ शाखांमध्ये प्रकार, वार्षिक अंकेक्षणात घोटाळा समोर
- एकूण २३ कोटी १९ लाखांची फसवणूक झाल्यानं बँकेला मोठा आर्थिक फटका
- १५९ खातेदारांकडून बनावट सोने तारण ठेवत जानेवारी २०२३ ते ऑक्टोबर २०२५ कालावधीतील प्रकार
- *खातेदार, मूल्यनिर्धारक, अंकेक्षक, अधिकारी संगनमत, बनावट दागिने खरे दाखवून कर्ज मंजूर
- विभागीय व्यवस्थापक धनंजय थिटे यांच्य चौकशीत घोटाळा उघडकीस आल्यानंतर धंतोली पोलिसात तक्रार...
- धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून यात सखोल तपास सुरू
- बेलतरोडी परिसरातील प्रकरणानंतर उघडकीस आला घोटाळा, संपूर्ण शहरातील शाखांची तपासणी होणार
- गहाण सोनं त्रयस्थ अधिकाऱ्यांकडून दागिन्यांची पडताळणी, त्यात मोठ्या प्रमाणात बनावट सोने आढळले
- बँकिंग प्रणालीतील मोठी पोकळी उघड झाली, आतील संगनमतामुळे घोटाळा वाढल्याचा अंदाज..
मिरा-भाईंदर : भाईंदरच्या इंद्रलोक परिसरात उभ्या असलेल्या संशयित टेम्पोवर नवघर पोलिसांनी छापा टाकत मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त केला. या कारवाईत सुमारे ६,६३,२८५ रुपयांचा विविध कंपन्यांचा पान मसाला व तंबाखू साठा हस्तगत करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, संशयास्पद टेम्पो उभा असल्याची माहिती नवघर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक संदीप व्हसकोटी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तपासणीदरम्यान वाहनात SAK, विमल, मस्तानी, सिग्नेचर आदी ब्रँडचा मोठा साठा आढळून आला.
महाराष्ट्रात गुटखा विक्री व साठवणुकीवर बंदी असताना हा साठा सापडल्याने पोलिसांनी तो जप्त केला आहे. संबंधित वाहनचालकाविरोधात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून गुटखा कुठून आणला व कुठे पुरवठा होणार होता, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
नागपूरच्या पंचशील चौकात एसबीआय बँक बिल्डिंगच्या वरच्या माळ्याला रात्री 11 वाजताच्या सुमारास आग लागली ...
आगीची सुरवात बिल्डींच्या वर असलेल्या सोलर रूप टॉप पासून झाल्याचे सांगितले जाते
आगीने लगेच रौद्र रूप घेतले, लगेच अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली
अग्निशमन दलाच्या चार गाड्यांनी काही मिनिटात आग विझवली
आगीत बँकेचे काही नुकसान झाले का हे अजून स्पष्ट होऊ शकले नाही
लोटे MIDC मधील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीच्या विरोधात पुन्हा एकदा जनआंदोलन.
6 एप्रिल ला आकरा गावांसहा कोकण नागरी संघर्ष समितीचा लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनी आणि पिफास च्या विरोधात हजारो नागरिकांचा भव्य मोर्चा.
जवळपास तीन महिने सुरु असलेल्या धरणे आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष केल्यानंतर अकरा गावातील ग्रामस्थ उतरणार रस्त्यावर.
जगाने नाकारलेला प्रकल्प कोकणाच्या माथी नको... लोटे MIDC परिसरातील नागरिकांसह असंख्य पर्यावरण प्रेमीची मागणी.
बारसु आणि नानार प्रमाणे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थान येथील "गावकरी गेट" खुले करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय...मागणी अनेक दिवसांपासून 'गावकरी गेट' खुले करण्याची मागणी होत होती...यापूर्वी केवळ आरतीच्या वेळी "गावकरी गेट" खुले असायचे, स्थानिक गावकऱ्यांना त्यातून थेट प्रवेश असायचा, मात्र आता मंदिर सुरू झाल्यापासून बंद होईपर्यंत "गावकरी गेट" खुले ठेवण्याचा निर्णय शनैश्वर देवस्थानने घेतलाय...त्यानुसार पहाटे चार ते रात्री दहा वाजेपर्यंत "गावकरी गेट" खुले करण्यात आले आहे...स्थानिकांना आधार कार्ड दाखवून या गेटमधून थेट प्रवेश करता येणार आहे.
मुंबई महानगरपालिकेने (BMC) 2025–26 या आर्थिक वर्षात मालमत्ता कर वसुलीत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. महापालिकेने आपले सुधारित उद्दिष्ट पूर्ण करत त्यापेक्षाही जास्त महसूल जमा केला आहे. यावर्षीची वसुली ₹7,500 कोटींच्या पुढे गेल्याने, ही अलीकडील काळातील सर्वात मजबूत आर्थिक कामगिरींपैकी एक मानली जात आहे. विशेष म्हणजे, उद्दिष्ट ओलांडण्यात महापालिकेला यश आले आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मते, कर वसुली प्रक्रियेत केलेले बदल, डिजिटल पेमेंटला मिळालेला प्रतिसाद आणि थकबाकी वसुलीवर दिलेला भर यामुळे ही वाढ शक्य झाली. त्यामुळे आगामी प्रकल्पांसाठी महापालिकेच्या तिजोरीत अधिक निधी उपलब्ध होणार असल्याचेही सांगितले जात आहे. एकूणच, मालमत्ता कर वसुलीत मिळालेल्या या यशामुळे महापालिकेची आर्थिक घडी अधिक मजबूत झाल्याचे चित्र आहे.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- Live Blog Updates: राज्यात पुढील 3 ते 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; विदर्भात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता