यावेळी 'आपले सरकार' या वेबसाईटवरील लाभार्थ्यांच्या नावांच्या यादीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
सुरुवातीला 10 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना पाहिल्या टप्प्यात लाभ मिळेल, असा दावा सरकारने केला आहे. दररोज 2 ते 5 लाख खाती निकाली काढण्यात येणार आहेत.
राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीच्या लाभार्थ्यांची यादी आपले सरकार या वेबसाईटवर जाहीर केली आहे.
शेतकरी कर्जमाफी लाभार्थ्यांच्या यादीत तुमचं नाव आहे का? इथे तपासा
- aaplesarkar.maharashtra.gov.in या वेबसाईटवर लॉग ऑन करा
- इथे वरच्या कोपऱ्यात इंग्रजी आणि मराठी असे दोन पर्याय दिसतील, तुम्हाला शक्य तो निवडा
- जर इंग्रजी सिलेक्ट केला तर डाव्या बाजूला, Chatrapati Shivaji Maharaj Shetkari Sanman Yojana - Year 2017 हे दिसेल. त्यावर क्लिक करा.
- जर मराठी सिलेक्ट केलं तर डाव्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना - वर्ष २०१७ हे दिसेल त्यावर क्लिक करा.
- उजव्या कोपऱ्यात लाभार्थ्यांची यादी दिसेल, त्यावर क्लिक करा.
- तिथे तुम्हाला जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत, बँक, ब्रँच हे सर्व निवडायचं आहे.