Laxman Hake बीड : ओबीसी आरक्षण (OBC Reservation) वाचविण्यासाठी महाराष्ट्रात ओबीसींची संघर्ष यात्रा निघणार असल्याचं ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी जाहीर केलंय. या अनुषंगाने लक्ष्मण हाके मराठवाड्यातील जिल्ह्यात बैठका घेत आहेत. जरांगेंच्या (Manoj Jarange Patil) आंदोलनाला ओबीसीचे काउंटर आंदोलन नसून मुंबईत जाऊन ट्रॅफिक जाम केली जाणार नाही. तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन होणार आहे. आमचे आंदोलन व्यवस्थेला चॅलेंज करणारे नसून संविधानाला धरून असणार आहे. अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी दिलीय. ते बीड येथे बोलत होते.
शरद पवारांच्या सांगण्यावरूनच जरांगे नावाचे मूळ महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलं
महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण तापलं असून 29 ऑगस्ट रोजी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईकडे (Mumbai) मोर्चा वळवणार आहेत. मात्र, ओसीबी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन काही नेत्यांकडून जाणीवपूर्वक शरद पवारांना लक्ष्य केलं जातं. सध्या ओबीसी (OBC) आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या लक्ष्मण हाके यांनीही गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्यावर आक्रमकपणे टीका केलीय. अशातच मराठा- ओबीसी वादाचे मूळ शरद पवार आहेत. शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच जरांगे नावाचे मूळ महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसले आहे. अशी बोचरी टीका लक्ष्मण हाके यांनी केलीय. यावेळी बोलताना त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावरही टीका केली आहे.
पंचायत राजच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते मुंबईला निघालेत
मराठा आरक्षण मागणं हा जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा फास आहे. ओबीसी आरक्षण संपवणे हा त्यांचा डाव असल्याचा गंभीर आरोप हाके यांनी केलाय. त्यांना आरक्षणाचे काही पडले नसून ओबीसीचे आरक्षण संपवायचे आहे. पंचायत राजच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते मुंबईला निघाले आहेत. महाराष्ट्रात ओबीसी आणि मराठा हा वाद कधीच नव्हता. मात्र, या वादाचे मूळ शरद पवार आहे. त्यांच्या सांगण्यावरून जरांगे नावाचे मूळ महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसले असून याने महाराष्ट्रातील भाईचारा बिघडल्याचं म्हणत हाके यांनी शरद पवार यांना लक्ष केलंय.
हेही वाचा
- Mumbai News: सरकारी अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यांना चाप; योग्य कारण दिल्यानंतरच परवानगी, दौऱ्याचा राज्य सरकारला काय उपयोग होणार? तपशील द्यावा लागणार
- मोठी बातमी : शरद पवारांसाठी महादेव जानकर ढाल बनले, टीकाकारांना म्हणाले, OBC हिताचा निर्णय पवारांनीच घेतला!